महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभाव यांची शिकवण दिली. कोणी लहान मोठा नाही सर्व सारखे समान आहेत अशी भावना समाजात निर्माण केली.
संत नामदेव : संत नामदेव हे शिंपी होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व समाजात जागृती निर्माण केली. ज्ञानेश्वराबरोबर त्यांनी महाराष्ट्रात आणि ज्ञानेश्वरानंतर पूर्ण भारत भर समतेचा संदेश दिला.
संत ज्ञानेश्वर : ज्ञानेश्वर हे नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते. ते आपेगावचे राहणारे होते. सण १२७५ मध्ये त्यांचा जन्म झाला. निवृत्तीनाथ व सोपानदेव यांचे ते छोटे बंधू होते. मुक्ताबाई हि त्यांची बहीण. त्यावेळची कर्मठ लोकं त्यांना संन्याशाची मुले म्हणून नवे ठेवत, त्याचे कारण असे कि त्यांच्या वडिलांनी घर सोडून संन्यास घेतला होता. पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना चार मुले झाली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्यांच्या मुलांचा लोक छळ करत होते.
ज्ञानदेव एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले आणि झोपडीचे दार बंद करून दुःख करत बसले होते. इतक्यात तेथे मुक्ता तेथे आली आणि गवताच्या ताटीवर टिचक्या मारत " ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आहो,आपण दुख्खी कष्टी होऊन कसे चालेल ? जगाचे कल्याण कोण करेल? मुक्ताईच्या उपदेशाने ज्ञानेश्वराला हुरुप आला. सर्व दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गरीब आणि मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना कळकळीचा उपदेश केला, " ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुख्खी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीशे करा" त्यांचा उपदेश सातशे वर्षांपासून लोकांना मार्गदर्शन करत आहे.
त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती. त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी होती. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतून फार मोठा ग्रंथ लिहला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले करून दिले. लोकांना समतेची व बंधुभावाची शिकवण करून दिली.
संत एकनाथ : संत ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. संत एकनाथ पैठण चे राहणारे होते त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यासाठी अनेक अभंग, ओव्या आणि भारुडे लिहली. कोणताही उच्च नीच भेदभाव मनू नका आसा उपदेश त्यांनी लोकांना केला. भक्तीचा मार्ग लोंकाना दाखवला गोरगरीब मागासलेल्यांना त्यांनी जवळ केले मुक्या प्राण्यांवर दया करा प्राणिमात्रांवर प्रेम करा असा संदेश त्यांनी दिला.
एके दिवशी ते गोदावरी नदीवर अंघोळीसाठी चालले होते. दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक महाराचे पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला त्यांनी इकडे तिकडे पहिले आणि धावत मुलाजवळ गेले आणि त्याला उचलून घेऊन त्याच्या घरी पोहचवले. अश्या प्रकारच्या त्यांच्या आचरणातून संत एकनाथांनी समतेची व ममतेची शिकवण समाजाला दिली.
संत तुकाराम : शिवाजीमहाराजांच्या काळात संत तुकाराम व संत रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे राहणारे. त्याच्या घरी शेती भाती होती. किराणा मालाचे दुकान होते, परंतु तुकाराम संसारात रमले नाहीत. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, अभंग रचत व ते लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. तुकाराम त्यांना दया, क्षमा, शांती यांची शिकावन देत.
जे का रंजले गांजले । त्याशी म्हणे जो आपुले ।
तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा "
हा संदेश त्यांनी लोकांना दिला. लोकांच्या मनात चांगले विचार जागे केले. आजही महाराष्ट्रात ग्यानबातुकाराम चा जयघोष ऐकू येतो.
संत रामदास स्वामी : संत रामदास स्वामी यांचा जन्म मराठवाड्यात जांब गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासाचे नाव नारायण होते पण ते स्वतःला रामाचा दास म्हणजेच रामदास म्हणून घेऊ लागले. महाराष्ट्रात जय जय रघवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमू लागली होती त्यांच्या दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा संदेश दिला तशेच मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद् विचार आणि सद् वर्तन यांची शिकावंन दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठीक ठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. " सामर्थ आहे चवळीचे जो जो करील तयाचे" हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संगठीत होण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्पुर्ती दिली.
No comments:
Post a Comment