Saturday, 13 February 2021

अंगराग गोमय उटणे

फक्त फेस पॅक नाही तर बॉडी पॅक सुद्धा
- आंघोळ अंगराग ने आंघोळ केल्यानंतर इतके ताजेतवाने  वाटले की जणू आयुष्यात पहिल्यांदाच आंघोळ केली 
अंगराग ने पाहिल्यानंदा आंघोळ करणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया
- केस गळणे अंगराग आणि आंबट ताक किंवा दही चे पाणी एकत्र करून लावावे. सोबत नाकात गो घृत- सुषमा चा वापर करावा एक ते दीड महिन्यात केस गळणे बंद होईल. साबण आणि शॅम्पू पूर्णपणे बंद करा
 - टक्कल अंगराग आणि दहीचे पाणी चा लेप करून कपाळ आणि डोक्यावर लावावे २० मिनिटे असेच लावून ठेवा. गो घृत-सुषमा चा वापर करावा. पित्त नियंत्रित ठेवावे ३ महिन्यात केस यायला सुरुवात होईल
- कोंडा अंगराग+गोमूत्र अर्क+पाणी, पूर्ण डोक्यावर लेप लावून अर्धा ते एक तास लावुन ठेवा. वात नियंत्रण करा
 - पुटकुळ्या ( पिंपल्स ) दिवसातून दोन वेळा चेहऱ्यावर अंगराग चा लेप लावावा. नंतर चेहरा धुवून खडबडीत रुमालाने चेहरा रगडून पुसा. खेळ किंवा व्यायाम करून शरीरातून घाम काढा. खराब वस्तू खाऊ नका चायनीज सारखे. बेकरीचे पदार्थ, जर्सी चे दूध वापरू नका, गोमूत्र हरडे चूर्ण घेऊन पोट साफ करून घ्यावे
- घामाचा वास-  अंघोळीसाठी साबण ऐवजी अंगराग आणि गुलाबजल लावून १५ थांबा नंतर आंघोळ करावी. काही दिवसांनी घामाचा वास येणे बंद होईल. पावडर लावून घाम येणे बंद करू नका, त्यामुळे बरेच आजार होऊ शकतात. पित्त दोष मुळे घामाचा वास येतो
- तेलकट त्वचा - साबण ऐवजी अंगराग पावडर वापरावी
- कोरडी त्वचा - साबण ऐवजी अंगराग आणि कच्चे दूध अंगाला लावून आंघोळ करावी कोणत्याही प्रकारची क्रीम लावण्याची गरज नाही
- सन बर्न- वरीलप्रमाणे उपचार आणि नस्य कराव
- काळे डाग - काळ्या डागांवर दिवसातून दोन वेळा अंगराग+कच्चे दूध एकत्र करून लेप लावावा, आणि हेच मिश्रण आंघोळीला वापरावे. हे वात आणि पित्त दोष वाढल्याने होतं
- फेस पॅक ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी गावरान गायीचे कच्चे दूध आणि ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांनी पाणी वापरावे आणि लेप करावा
 - त्वचारोग :- साबण लगेचच बंद करून अंगराग पावडर ने आंघोळ करावी
 - गुढघेदुखी :- गुढग्यावर अंगराग पावडर चा लेप करून उन्हात बसा गुढग्यावर ऊन आले पाहिजे
दुसरा कोणताही शेक घेऊ नका
- रक्तदाब :- अंगराग कातडी सोबत रक्तवाहिन्या ना पण नरम करत. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्तदाब सामान्य होतो
- ताप :- जास्त ताप आलेला असेल तर, डोकेदुखी, सर्दी मूळे बंद झालेलं नाक यासाठी अंगराग पावडर कपाळाला लावावी. ( जाड लेप द्यावा )
पाच मिनिटांत नाक मोकळे होईल, १० ते १५ मिनिटात डोकेदुखीत आराम, अंगराग चा लेप ४५ मिनिटे लावून ठेवावा. दोन ते तीन तासात ताप पण कमी होईल.
- मानसिक थकवा :- परीक्षेच्या काळात जास्त अभ्यास, केल्याने अधिक प्रमाणात वाचन केल्याने, झोप पूर्ण न झाल्याने, मानसिक तणाव वाढल्याने डोकं जड झालं असेल तर, अर्धा तास अंगराग पावडर चा लेप लावा आणि शांतपणे पाठीवर आराम करावा, किंवा शांत झोपावे, जबरदस्त ताजगी चा अनुभव येतो
- शारीरिक थकवा :- काम करून आलेल्या थकव्याला अंगाला अंगराग पावडर १५ मिनिटे लावून ठेवा आणि मग आंघोळ करा, थकवा छुमंतर
- विकृती :- निसर्गापासून दूर गेलं की विकृती त्याची जागा घेते. असे काही मुल (ऑटिस्टिक ) आपल्याच धुंदीत असतात. अश्या मुलांना रात्री २ ते ३ वाजेपर्यंत झोप येत नाही. यांना रात्री नऊ वाजता अंगराग पावडर चा गोळा बनवून खेळायला द्या अर्ध्या तासात त्यांना झोप लागेल.
- धर्म रक्षा :- बहुतेक साबनात गायीची चरबी असते, ज्यामुळे गोहत्येला चालना मिळते. साबण वापरल्याने पैसा गो हत्या करणाऱ्या लोकांना जातो
पण अंगराग पावडर वापरली तर हा पैसा गोपालन करणाऱ्या लोकांना जातो
 - धन रक्षा :- १५ ते २० रुपयांचे साबण खरंतर १ ते २ रुपयात तयार होतात कारण त्याचा गुणवत्तेशी काहीच सम्बन्ध नसतो. त्यात सुगन्ध पेट्रोकेमिकल्स पासून आणि फेस विषारी रासायनिक पदार्थ SLS पासून तर चिकटपणा चरबी चा उपयोग करून किंवा सोप स्टोन पासून केला जातो. कॉस्टिक सोडा घाण नाही काढत तर त्याला रंगविहिन ( ब्लिच ) करतो. 
परंतु अंगराग पूर्णपणे नैसर्गिक आहे, यात मुलतानी माती, हळद, त्वचेचे पोषण करणारे गावरान गायीचे शेण, भसम याचा वापर केलेला असतो.
- अंगराग चा वापर चेहऱ्यावर लावण्यासाठी पण करता येतो
फेस पावडर ची गरज नाही उन्हाळ्यात घाम येतो म्हणून ही पावडर वापरता येते

मधमाशी चा स्पर्श

मधमाशी
फुलांना होनारा मधमाशी चा स्पर्श म्हणजेच लोखंडाला परिसाचा स्पर्श होण्यासारखाच असतो. फुलांना मधमाशी चा स्पर्श हा परिसस्पर्शा ईतकाच सामर्थशाली असतो.यासाठी शेतातून सतत सोने पिकवायचे असेल तर मधमाशांची काळजी घेणे गरजेचे आहे.
     आपण सर्वच शेतकरी स्वता शेतीचे सर्वच कामे करत असतो. शेतीमंध्ये मेहनत करुन सोन्यासारखे पिके तयार करून त्यामधुन ऊत्पादने घेत असतो मात्र आपल्याला ऊत्पादने घेण्यासाठी व शेती करण्यासाठी मुंग्या, मधमाशा, मित्र किटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीवजंतू मदत करत असतात. परंतु ह्या सर्वांमध्ये मधमाशा आघाडीवर असतात.
 मधमाशी नष्ठ झाली तर ०४ ते १० वर्षांपासून पुढे मानव जात ही नष्ठ होण्यास सुरुवात होईल.कारण मधमाशा विविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीभवन (pollination)  करीत असतात. अनेक फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला पिके व धाण्यपिके यांचे परागीभवन फक्त मधमाशी च करु शकते. विशेष म्हणजे जे अण्ण् परागीभवन होऊन येत नाही ते अण्ण् खाण्यासाठीही पौष्टीक नसते. 
      आपण अलिकडे अणेक डाळिंब बागायतदार मधमाशांच्या पेट्या बागेत ठेवतात असे बघतो. कारण की सफरचंद, डाळिंब व ईतर निंबुवर्गिय तत्सम पिके यांचे परागीभवन फक्त आणि फक्त मधमाशी च करु शकते. डाळिंबातील नर फुले व मादी फुले वेगवेगळी असतात. मधमाशी नर फुलातील पराग उचलुन मादी फुलावर सोडतात . यामुळे डाळिंबातील मादी फुले फलीत होऊन फळात रूपांतर होते.जितक्या वेळेस मधमाशी नर फुलातील पराग मादी फुलावर आणुण सोडेल तीतक्या प्रमाणात डाळिंबाचे फळे आकाराने मोठी होतात. हे आज आपल्याला समजले आहे मात्र मधमाशांना काय आवडते हे आपल्याला अजुनही माहीत नाही किंवा आपण समजाऊन घेण्याचा प्रयत्न करत नाही. मधमाशांना पोळे तयार करायला कुठले झाडे आवडतात. जसे - बोर , बाभुळ .  मधमाशांना मकरंद गोळा करण्यासाठी काय आवडते. जसे - सुर्यरफुल...
       सेंद्रीय शेतीचा व जैवीक शेतीचा गाभा म्हणजेच मधमाशी होय... मधमाशांनी जास्त वेळा फुलांना स्पर्श केला तर अशा फुलापासून तयार होणाऱ्या फळावर रोग आणि किडी यांचा प्रादूर्भाव ही कमीच असतो. मधमाशांनी अनेक वेळा स्पर्श केलेल्या फुलापासून तयार होणाऱ्या फळांची आंतरीक संरचना सद्रूढ  असते. आणि कोणत्याहि सद्रुढ वनस्पतीवर रोगाचा प्रादूर्भाव कमीच असतो. मधमाशीचा फुलांना झालेल्या स्पर्शावरच फळांचा आकार, रंग , स्वाद आणि दर्जा अवलंबून असतो. स्वपरागीभवना पेक्षा मधमाशा द्वारे परागीभवनातून (pollination) निर्मान होणारे फळे , वनस्पती जोमाने, भरदार, ऊंच व सद्रुढ वाढलेली असतात. यावरुन मधमाशांचा फुलांना केलेला स्पर्श किती महत्वाचा आहे हे लक्षात येते. मधमाशांनी जितक्या जास्त वेळा फुलांना स्पर्श केला तर तीतक्या प्रमाणात डाळिंबाच्या फळांच्या आकारात वाढ होऊन ऊत्पादनात वाढ मिळते. म्हणुनच मधमाशी शिवाय ऊत्पादनात वाढ होऊच शकणार नाही हे प्रथमता  स्विकारने गरजेचे आहेठेवतात मानवजातीला निसर्गाने निसर्गातील जैवीक विविधता आबाधीत राहावी म्हणून मधमाशी च्या रूपाने जैवीक- परिस बहाल केला आहे. मात्र हा जैवीक परिस ऊपलब्ध असुनही तो वापरण्याचे ज्ञान व कौशल्य मानवजातीने आत्मसात न केल्यामुळे पीक ऊत्पादन वाढीचे सर्व प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहे...
   निंबुवर्गिय झाडांच्या फुलांचे फळात रूपांतर करण्यात मधमाशा आघाडीवर असतात. सफरचंद , डाळिंब व तत्सम निंबुवर्गिय फळे जोपर्यंत पृथ्वीवर मधमाशा आहे तोपर्यंतच आपण बघु शकतो. ज्यावर्षी  पृथ्वीवरून मधमाशा नष्ठ होतील त्याचवर्षी पृथ्वीवरून हे फळे देखिल कायम स्वरुपी नष्ठ होतील. हे आपण शेतकऱ्यांनी वेळीच लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे. माणसामुळे मधमाशांच्या जीवनशैलीत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. मधमाशांनी नैसर्गीक आधीवासामंध्ये बदल केला आहे आणि तोही फक्त आणि फक्त माणसांच्या चुकामुळेच. म्हणुन ईथुन  पुढे जगण्यासाठी मधमाशा वाचवणे हे मानवजाती पुढील मोठे आव्हान असनार आहे. 
    जेव्हा झाडांना फूले येतात व त्या फुलांचे फळात रूपांतर होते हा कालावधी २० ते ३० दिवसांचा असतो ह्या कालावधीमंध्ये झाडावर कुठलंही रासायनीक किटकनाशक फवारणी करु नये.  रासायनीक किटकनाशकामुळे मधमाशा मरतात व काही रासायनीक किटकनाशकामुळे मधमाशींचा स्मृतीभ्रंश होतो त्यावेळी त्यांना ज्या पोळातून आल्या आहेत त्या पोळाचा रस्ता सापडत नाही. म्हणुन झाडांच्या फुल निघे पासुन ते फुलाचे फळात रूपांतर होनार्या २० ते ३० दिवसांच्या कालावधीत मधमाशांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. ह्याचबरोबर अलिकडे polly house  व  शेडनेट मधील शेती वाढत आहे. अशा polly house व शेडनेट मधील शेतीमंध्ये परागीभवनासाठी मधमाशा असणे  ही महत्वपुर्ण गरज आहे. म्हणून शेतकरी मधमाशांचे पोळ किंवा पेटी आपल्या polly house  किंवा शेडनेट मध्येदेखील ठेवतात. त्यातच किटकांच्या प्रादूर्भावा पासून बचावासाठी YELLOW STICKY PAD ही वापरतात ह्या YELLOW STICKY PAD ला अडकून मधमाशा मरतात . म्हणून मधमाशांचे पोळ किंवा पेटी ठेवलेल्या POLLY HOUSE  किंवा शेडनेट मध्ये YELLOW STICKY PAD  लाऊ नयेत.  
        मधमाशा मधपेटी किंवा पोळा पासून २ ते ३ कि. मी. अंतरावर जाऊन मध गोळा करत असतात व एका फेरीत १० फुलापासुन ते मकरंद ऊपलब्धते नुसार १०० किंवा त्यापेक्षा जास्त फुलावर बसत असतात. मधमाशा राणी माशी, नर माशी व कामकरी माशी अशा प्रकारात असतात. व प्रत्येकाची कामे ठरलेली असतात. थंडी वाढली की मधमाशा काम करत नाही कारण की पोळामधील पिलांना थंडीपासून ईजा होऊ नये तसेच पोळामधील वातावरण स्थिर राहावे म्हणुन ऐकमेकांच्या शरीराची उब निर्मान होईल  ह्यासाठी पोळावर गर्दी करुन बसतात .  ह्या कालावधीमंध्ये गोळा केलेल्या मधावरच मधमाशा गुजरान करीत असतात. निसर्गतःच निसर्गातुन थंडी आणि कडक ऊन्हाळ्यात मधमाशांना अण्ण् ऊपलब्ध होऊ शकत नाही. तेव्हा पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत रसायण विरहीत गुळाचा पाक करुन मधमाशांच्या पोळापासून १० ते ५० फूट अंतरावर ठेवावा. 
     ईथे प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवने गरजेचे आहे. मधमाशा ह्या पाझरणारेच पाणी पीतात किंवा गाळातील पाणी पीतात. प्रत्यक्ष पाण्यात ऊतरून मधमाशी कधीही पाणी पीत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये कृत्रीम पाणवठे निर्मान करायला शिकले पाहीजे...
    फळपिकांचे अर्थकारण मधमाशी भोवतीच फिरते म्हणुन मधमाशांची काळजी घेणे गरजेचे आहे.

Friday, 12 February 2021

हिवाळ्यातील आहार 'एक संजीवनी'

🍛"अन्न हे पूर्ण ब्रम्ह" असे म्हटले आहे 

🧐आरोग्यात वृद्धी आणि शरीरास पुष्टी देणारा ऋतू म्हणजे शीत ऋतू असे म्हणतात शीत ऋतूत खाल्लेले अंगी लागते आणि ते संपूर्ण वर्षभर आपल्याला भरपूर जीवनसत्वांचे पोषण देते म्हणूनच थंडी आली कि विशेष खान पानाची कटाक्षाने खूप जण जागरूक असतात . 

▪️आपल्या शरीरातील जी तत्वे कमी असतात ती आपण विशिष्ट आहाराने भरून काढू शकतो आणि काही तत्वे जास्त असतील तर ज्या पदार्थात ते आहेत ते आपण खाण्याचे वर्ज्य करायचे म्हणजे शरीराचा समतोल छान राहतो व शरीर सुडौल राहते

▪️शीत ऋतूत जठराग्नी प्रबळ असते त्यामुळे पचनशक्ती उत्तम असते आणि पौष्टिक जड स्निग्ध पदार्थ सहज पचन होतात 

▪️या ऋतूमध्ये उष्मा हा बाहेरच्या शीत वातावरणामुळे शरीरातच राहतो आणि प्रबळ होतो त्यामुळे जठराग्नी अजून बलवान होते ज्यामुळे सशक्त व्यक्ती जो पण आहार घेतात तो पचन होतो .

▪️शीत प्रदेशातील लोक तुलनेत जास्त निरोगी असतात आपल्या कडे हा शीत ऋतू फारच थोडा असतो मग ह्याचा उपयोग आपण आरोग्यासाठी करून घ्यायला नको का ? 

▪️ थंडीत रात्र मोठी असते दिवस लहान त्यामुळे खाल्लेले सर्व व्यवस्थित पचते मग उत्तम पचनशक्ती आणि पचण्यास भरपूर वेळ असेल तर आहारात पौष्टिक आणि बलवर्धक पदार्थ सेवन नियमित आणि वेळोवेळी घेतले पाहिजे 

▪️जेवणाची वेळ आणि वेळेवर जेवण ह्या नियमाचे पालन केलेच पाहिजे जसे कि भूक लागल्यावरच खावे भूक मिटल्यावर खाऊ नये असे न केल्यास शरीर आणि स्वास्थ्य दोन्ही बिघडते 

▪️आहारात फळे ,सुके मेवे दुध तूप घेतले पाहिजे .ऋतुमानानुसार खाण्याचे भारतीय संस्कार आणि मोसमी फळे भाज्या ह्यामुळे हि स्वास्थ्य उत्तम राहते .

📌 *थंडीत घेण्याचे विशेष आहार* :

१) उडदाच्या डाळीचा साजूक तुपातला गोड शिरा , गूळाचे पदार्थ 

२) डिंकाचे लाडू ,मेथीचे लाडू ,गाजर हलवा आणि मांसाहार ,पालेभाज्या , भाज्यांचे सूप 

३) बाजरीची भाकरी , मक्याची भाकरी , ताज्या मक्याचे पदार्थ व सूप आणि भारुपूर सुके मेवे ,केशर आणि सुकेमेवे घालून उकळलेले दुध 

४) कडधान्ये आणि सप्तधान्ये , तिळाचे लाडू , तिळाची पोळी , तिळाची चटणी ,गुळ घालून केलेले पदार्थ , शेगदाणे आणि गुळ ह्याचे लाडू , चिक्की ह्या सगळ्यातून आपल्याला विशेष उर्जा आणि बहुमोल जीवनसत्वे मिळतात . 

५) गाईच्या दुधापासून काढलेले तूप नित्य आहारात असावे

💁‍♀️ *ह्या व्यतिरिक्त विशेष* 

👉व्यायाम प्राणायाम आणि आठवड्यातून किमान एकदा तिळाच्या तेलाने सर्वांगास मालिश करावी .

👉शीत ऋतूत आहार, व्यायाम नित्याच्या जीवनात ठेवावा मग पहा आपण कसे निरोगी राहतो ते . हिवाळी आहार हा आपल्या आरोग्यासाठी निसर्गाकडून मिळालेली एक संजीवनीच आहे.

Thursday, 11 February 2021

नेहमी लक्षात ठेवा**कुणी कुणाचेच नाही

*नेहमी लक्षात ठेवा*
*कुणी कुणाचेच नाही*
 
*_सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते_*   
*_जेव्हा  सीतेचे हरण झाले तेव्हा कोणी नव्हते._*

*_द्रौपदीचे रक्षक पाच पांडव होते_*
*_वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते_*

*_राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते_*
*_जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते_*

*_लंकेचा राजा रावण  शक्तिशाली होता_*
*_पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते_*

*_श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते_*
*_जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते_*

*_शरशय्या वरती भीष्म पितामह होते_*
*_वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते_*

*_राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते_*
*_पण चक्रयुव्ह मधून काढण्यासाठी कोणी नव्हते_*

*_सर्वांसाठी त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे_*
*_या जगात आपले कोणी ही नाही._*

*_ज़े विधात्याने लिहिले आहे आणि जसे आपले कर्म आहे त्यापुढे कोणी जाऊ शकत नाही._*

*जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर* 
*हेच आणि हेच एक सत्य आहे.*

*केवळ कर्मच आपले आहे* 
 *देवा पेक्षा कर्माची* 
 *भिती  बाळगावी,*
 *एकवेळ देव माफ करील पण कर्म नाही.*
*फुंकर मारून आपण दिवा विझवु शकतो*
*पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते,त्याला कोण विझवु शकत नाही..*

🌹🌹

यज्ञ

🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵
       *!! यज्ञ- !!*
*खूप खूप खूप महत्वाचा लेख आहे हा. अवश्य वाचा.* 
यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे. सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते, निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यु ह्या प्रवासात्त त्या समाविष्ट केलेल्या आहेत व त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत वा आयुष्यहोम हा यज्ञ वा होम मुलाच्या जन्मापासून ते पुढील आयुष्यप्रवास निरोगी व्हावा ह्याकरता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, दीर्घायुष्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जाहोम, घरासाठी वास्तूशांत इ. करण्यास सांगितले आहेत.

पण हे झाले छोटे यज्ञ.समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रुद्रयाग, पर्यावरणासाठी सोमयाग, पर्जन्ययाग ह्यासाठी प्रसंगारूप मोठे यज्ञ केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱ्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून अग्नीप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, सालीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार इ. वृक्षांच्या खाली पडलेल्या कांड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास 3 ते 4 तासाचा अवधी व मोठा यज्ञपूर्ण करण्यास 3 ते 7 दिवस अवधी लागतो.आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता 'अग्निहोत्र'ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधले. सर्व यज्ञात जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. ह्या सर्व यज्ञात मनःशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश "अग्निहोत्र'ने सुद्धा लाभू शकतात हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिध्द करण्याचे काम आम्ही गेले 5-6 वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यापर्यंत देण्यासाठी हा लेखनप्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.

"अग्निहोत्र' हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी 10 मिनिटात करता येतो.ह्या यज्ञाला जास्तीत जास्त रु. 3/- ते रु. 5/- इतका खर्च येतो.अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळाउपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र२. गाईच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे३. गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५ तुकडे४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे ४-५ ग्रॅमसूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम्नमम || हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे.अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ. अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले. 

अग्निहोत्र प्रयोगाची खालील उदिष्ट्ये ठरवण्यात आली...१. अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल२. अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम३. अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम४. अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीवर होणारा परिणाम५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म६. अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण.हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली व त्यासाठी प्रज्ञा विकास मंचाच्या 'फ्रॉस्ट' ह्या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्स मीटरच्या साह्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ 90% सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले.प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले.रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात होते हे आढळून आले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.अवघ्या रु. ३/- ते ५/- खर्चात रोज फक्त १० मिनिटे सकाळी वा संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतू विरहीत करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो- हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून, जागतिक वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध करू शकलो व जगात आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ह्यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी "मिनरल वॉटर" इतकं शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता सर्वानीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी नबाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे. 

ह्या अभ्यासा दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, पोलंड, झेकस्कलोकोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्विझर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Home Farming Technique असे नावही दिले आहे.दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातूशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली आपला झोपी गेलेल्या, गुलामगिरी मानसिकतेच्या शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत.परवाच महालक्ष्मी मूर्तीवरती मूर्ती संवर्धनासाठी कोल्हापूरी लेप चढवण्यात आला. तो लेप आपल्या पूर्वजांनी 'वज्रलेप' म्हणून २००० वर्षापूर्वी तयार केला होता- तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. नुकतेच ह्याच महिन्यात इंग्लंडस्थित 'पॅनगयिया' ह्या कंपनीने आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या करताआपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला.आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण 'कथिलाचा वाळा' हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.

आय ओपनिंग

आय ओपनिंग

"मैकौले च्या तथाकथित आधुनिक शिक्षण व्यवस्थेने भारतवासियांचे कंबरडे मोडुन भावि पिढीचे भविष्य अक्षरशः अंधकारमय केले"

*कुणी उध्वस्त केली भारतीय व्यवस्था

 "भारत हा कधीच फक्त कृषीप्रधान नाही तर उद्योग प्रधान देश होता"*

*जळजळीत, उघडी नागडी सत्ये जी प्रत्येक भारतीय व्यक्तीने आपल्या नरड्यात हलाहल म्हणून ओतून घेणे अत्यंत आवश्यक आहे..*
 
१) आई वडिलांचे गुण लहान मुलांच्यामध्ये उतरतात. मग त्याच गुणांना पोषण देणारे वातावरण असेल तर ती मुले आई वडिलांच्या पेक्षा त्या क्षेत्रात अधिक प्रगती करतात. हे जेनेटिक्स अर्थात वंशशास्त्राच्या अभ्यासकांनी सुद्धा सिद्ध केले आहे. 
२) १००० पैकी ९९९ मुले सामान्य असतात. अद्वितीय किंवा लोकोत्तर गुण घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प असते. बाकी मंडळी सर्वसामान्यच असतात. 
आपल्या जुन्या बारा बलुतेदारी या संकल्पनेला आपण ब्रिटीशांच्या कृपेने आणि मॅकालेच्या शिक्षणाने संपवून टाकून नक्की काय गोंधळ निर्माण केला आहे आणि हा सार्वत्रिक पातळीवर आपल्या समाजाला कसा उध्वस्त करतो आहे ते समजून घ्या. 
*बारा बलुतेदारी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची रोजगार हमी योजना होती. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच होणार. शेतीचे पारंपारिक ज्ञान तो आपल्या वडिलांच्या कडून घेणार त्याचा वापर करून स्वअनुभवातून त्यात चार गोष्टी जोडून आपल्या मुलाला देणार. यात पोटापाण्याची चिंता मिटलेली असे*. 
*सुताराचा मुलगा हा लहान असतानाच वडील बाजूला काम करता करता तो सुद्धा हातात लाकडाचा तुकडा घेऊन वडिलांचे बघून शिकणार. तो ज्यावेळी २० वर्षाचा होई त्याचवेळी तो पूर्ण कुशल सुतार झालेला असेल*. 
*हीच गोष्ट बारा बलुतेदारी मधील प्रत्येक व्यक्तीची होती. त्यांना गणित येत नव्हते आणि ते अनपढ होते हे तुमच्या मेंदूत शिरवणारे लोक पहिल्या दर्जाचे नीच आहेत.कारण बारा बलुतेदारी मधील प्रत्येक कार्य करायला तुम्हाला जे प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान लागणार आहे ते तुम्हाला तुमच्या पित्याकडून प्राप्त होणारच आहे*. 

ब्रिटीशांचे पांढरे पाय या देशात उमटण्याच्या आधीपासून आपल्याकडील लोक सर्वोत्कृष्ट दर्जाची उत्पादने बनवत होती. *आपण जगाच्या व्यापारात २३ % हिस्सा बाळगून होतो आणि तो फक्त मसाल्याचा नव्हता. त्यात उत्कृष्ट दर्जाचे कापड होते .*
अत्युत्कृष्ट दर्जाच्या शोभेच्या वस्तू होत्या. जगाला कितीतरी धातू शेकडोवर्षे पुरवठा करणारा एकमेव देश हा आपला बहुमान होता. यापैकी मुख्य धातू म्हणजे जस्त आहे. शुद्ध जस्त ओतून काढणे हे शेकडो वर्ष जगाला ज्ञात नव्हते. ते तंत्रज्ञान फक्त आपल्याकडे होते. चीन ने आपल्याकडून चोरून नेले. 
दगड, लाकूड, धातू , वस्त्र या सगळ्यांवर केले जाणारे नक्षीकाम संपूर्ण जगात आपल्या तोडीचे कुठेही होत नव्हते. आपली मंदिरे, हलाखीत जगणारे काष्ठ शिल्पी, हलाखीत जगणारी विणकर मंडळी म्हणजे या वैभवाच्या भग्न खुणा आहेत.   
*जर शिक्षणाचा उद्देश हा त्या ज्ञानाचा वापर करून पोट भरणे ,चरितार्थ चालवणे हा असेल, भरपूर पैसे कमावणे हाच असेल तर या जुन्या कलाकार मंडळींच्या पैकी कोण भिकारी होता ???*
 
यांना भिकेला आपण लावले आहे. यांना भिकेला ब्रिटीशांच्या शिक्षण पद्धतीने लावले आहे आणि हे सत्य  आपल्या निर्बुद्ध मेंदूमध्ये कधी शिरणार हा यक्ष प्रश्न आहे. 
अलेक्झांडर उर्फ सिकंदर आपल्या देशावर हल्ला करायला का आला माहिती आहे ??? 
*भारतात एक तगर नावाचे गाव होते. तेथील कापडाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की तगर चे कापड वापरणे हे सिकंदराच्या राज्यात श्रीमंतीचे,ऐश्वर्याचे लक्षण मानले जाई. तगर च्या कापडाची इतकी मागणी वाढली की तेथील स्थानिक कापड उद्योग बंद पडायची वेळ आली. मग सिकंदराने तगर येथील कापडावर अतिरिक्त कर बसवला. तरीही त्या कापडाची विक्री कमी झाली नाही. खुश्कीच्या मार्गाने तगर प्रतिष्ठान पुढे खैबरखिंड करत आपल्याकडील उत्पादने जगभरातील बाजारपेठेमध्ये जात होती. सिल्क रूट च्या गप्पा चीन मारतो. चीन च्या काही कोटी पट आपला व्यापार होता.*
 
हे तगर गाव कोणते आहे माहिती आहे का ?? 
तगर म्हणजे तर. उस्मानाबाद/ धाराशिव जवळचे तेर नावाचे गाव. *डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा मतदारसंघ. आज जाऊन पहा. कापडातील क तिथे दिसणार नाही. ते सगळे तंत्रज्ञान समूळ नष्ट झाले आहे.*    

जुन्याकाळात सामान्य लोक आपल्या आई वडिलांचाच व्यवसाय पुढे चालवत असत. यात पिढीजात कौशल्य अंगी असे. या शिवाय आई वडिलांच्या हाताखाली लहानपणाच्या पासून ते काम केल्याने तारुण्यात पदार्पण करेपर्यंत ते कौशल्य सर्वार्थाने विकसित झालेले असे. त्या तरुणाला त्याची उपजीविका चालवता येईल इतके त्याच्या क्षेत्रातील ज्ञान वीस वर्षाचा असताना प्राप्त झालेले असे. 
१००० मधील ९९९ लोकांच्या साठी ही पद्धती उत्तम होती. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्नच निर्माण होत नसे. 
आता जो विरळा हजारातील एक असे. तो त्याला आवडेल ती वाट चोखाळेल त्या साठी त्या क्षेत्रातील तज्ञ माणूस गाठेल आणि शिकेल. हे करताना जे त्रास होतील ते सहन करेल पण आपल्याला आवडेल तो मार्ग तो चोखाळू शकत असे. 
यात काहीही गैर नव्हते. सामाजिक चौकटीत याची मुभा होती. 

*आपल्या प्राचीन ऋषी मुनींच्या मते कोणतेही ज्ञान, कोणतीही विद्या संपूर्ण शिकायला १२ वर्षे लागतात. मग ८व्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर त्यातील कौशल्य पाहून त्याने त्या विषयाचा अभ्यास सुरु केला की तो २० वर्षाचा होईतो पूर्ण ज्ञानी होईल. मग शिल्प कला असेल , नृत्य असेल , पारंपारिक बारा बलुतेदारी असेल किंवा राजा, अथवा अधिकारी बनवणारे गुरुकुलातील शिक्षण असेल. पण २० वर्षाचे होईतो तुम्ही त्यात पूर्ण निपुण झालेले असता. आणि तुमच्या कौशल्याची परीक्षा घेऊन तुम्हाला नोकरी मिळू शकत असे.* 

जो नृत्य, संगीत शिकणार असेल तो त्या गुरूकडे १२ वर्ष फक्त तेच आणि तितकेच शिकेल. त्या जोडीला व्यावहारिक प्राथमिक शिक्षण जे असे ते घरी ८ वर्षाचा होईतो मिळालेले असे. आणि तो व्यक्ती विज्ञान , इतिहास किंवा अन्य कोणतेही ज्ञान जे घेईल ते त्याच्या नृत्य किंवा संगीत या क्षेत्रात त्याला जितके लागणार आहे तितकेच घेईल अतिरिक्त नाही. पण त्यामुळे त्याचे काहीही अडणार नाही. 
*आपल्याकडील हजारो वर्ष टिकतील अशी मंदिरे, त्यावरील शिल्पकला हे सगळे या फुलप्रूफ यंत्रणेचेच यश होते. आपली आर्थिक समृद्धी आपल्या शिल्पींच्या सर्व क्षेत्रातील या उत्कृष्ट लोकांच्या उत्तम पर्फोर्मंस चेच यश होते.* 

लोहार असेल , सुतार असेल , चांभार असेल, सामान्य असेल तरी खाऊन पिऊन सुखी होते. कौशल्य असेल तर त्या क्षेत्रातील शिल्पी होऊन भरपूर संपत्ती कमावणारा असे. 
हे व्यवसाय म्हणजे त्या त्या लोकांची जात होती.* 
परंतु 
हे संपूर्ण नेटवर्क ब्रिटिशांनी उध्वस्त केले. 
आज तथाकथित समानता आली आहे. यामुळे काय झाले ? बारा बलुतेदारीतील प्रत्येक बलुतेदार, शेतकरी, ब्राह्मण सगळेच्या सगळे आपल्या मुलांना एकाच शैक्षणिक चरकात घालतात. शिक्षण सुरु होते ३ वर्षाचे असताना. ज्याला बेसिक शिक्षण म्हणू ते पूर्ण होते १५ वर्षाचे असताना. दहावीमध्ये. 
या १२ वर्षात ते मुल काय शिकले आहे ? 
देशाचा आणि जगाचा इतिहास, भाषा, गणित, विज्ञान. यापैकी कोणते ज्ञान वापरून त्याला दोन वेळेस खायला काही मिळू शकते ??? कोणतेच नाही कारण त्याच्यासारखे १० लाख विद्यार्थी हेच ज्ञान घेऊन उभे आहेत. 

मग आता तीन शाखा झाल्या. कला , वाणिज्य आणि शास्त्र पुढे दोन वर्ष शिका. त्यातून काही रोजगारासाठी मिळाले का ? नाही. 
मग पदवी मिळवा.  
बेसिक पदवी मिळाली २० वर्षाचा होताना. शिक्षणात घातली १७ वर्षे. या बेसिक पदवीच्या शिक्षणावर तो कोणती नोकरी मिळवू शकतो ? 
कारकून, चपराशी, छोटा फिल्ड सेल्समन, डिलिव्हरी बॉय, हॉटेल मधील वेटर. 
या साठी तो किती वर्ष शिकला १७ वर्ष. आणि हेच काम करू शकणारे १० लाख स्पर्धक त्याच्या समोर उभे आहेत. फक्त राज्य या पातळीवर. देशाचा विचार केला तर २ कोटी निश्चित असतील. 

👉जर इंजिनियरिंग ला गेला. तर मेकॅनिकल मध्ये त्याला पहिल्या वर्षी काय शिकवतात ?
 किती प्रकारच्या फाईल्स असतात ? त्यांचा वापर करून कसे तुम्ही घासू शकता. 
असे ज्ञान जे पारंपारिक लोहार आपल्या मुलाला गम्मत म्हणून एखादी गोष्ट घासायला देताना ८ वर्षाचा असताना शिकवेल ते आपण १८ वर्षाच्या मुलाला सांगतो आहोत इंजिनिअरिंग मधे आणि त्यासाठी तो पोरगा काही लाख रुपये मोजतो आहे. इतके करून फायलिंग करणे ही कला फक्त डायमेकर आदी मंडळींच्या साठी उरली आहे बाकी कोणीही याचा वापर करत नाही. आमच्या वेळी लेथ चालवायला शिकवायचे आज सगळीकडे CNC मशीन्स आल्या आहेत. 
पारंपारिक मशीन्स चा वापर वेगाने कमी होतो आहे. 
या सगळ्याचे प्रतिबिंब शिक्षणात उमटते आहे का ? 
४ वर्षाच्या अभियांत्रिकी कोर्स मध्ये मुलांना बेसिक्स पण माहिती असावे म्हणून हे शिकवणे त्यांना भाग आहे कारण बेसिक माहिती नसेल तर पुढे त्याना आकलन कसे होईल ? 
पण बेसिक तुम्ही जर १८ व्या वर्षी शिकवणार असाल तर तो पूर्ण कुशल अभियंता कधी होईल ? 
३० वर्षाचा झाल्यावर ??? 
यापेक्षा भयानक स्थिती वैद्यकीय क्षेत्राची आहे. 
४.५ वर्षाची पदवी मग पुढे २-३ वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पुढे कुठेतरी उमेदवारी आणि मग खऱ्या अर्थाने चांगली नोकरी अथवा व्यवसाय. म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी खऱ्या अर्थाने पायावर कधी उभे राहणार ??? 
३० वर्षाचे झाले की ?
 त्या नंतर लग्न.. 
प्रत्येक पुरुष आणि स्त्री विशिष्ट वयात प्रौढ होतात. कामभावना जाग्या होतात. त्या वयाच्या पासून पुढे १२ वर्ष आपण काय करतो आहोत ? 
तर ते दाबून शिक्षणाच्या चरकात लोटतो आहोत. 
३० वर्षाचे होईतो मुलांना आई बाप पोसत आहेत. त्यामुळे आई बापांच्या प्रमाणे यांची मानसिकता होते आहे. त्यानंतर लग्न झाले की मग बायकोशी आणि नवऱ्याशी कसे पटेल ? 

तारुण्याचा, प्रेमाचा पहिला बहर ओसरल्यावर लग्न करून ते नाते तितके उत्कट निर्माण होईल का ? 
आणि १८-३० या कालखंडात ज्याच्या कुणाच्या बद्दल प्रेम असेल आणि त्यामुळे जवळीक निर्माण झाली असेल. ती पहिली सुखद आठवण आहे ती या नात्याच्या आड कळत न कळत कितीवेळा येते याची गणना करणेच अशक्य. 

*आधुनिक विवाहाचा जर पायाच तिशी असेल तर तो विसविशीत असणार यात नवल ते काय ?*
 
लग्न ही संकल्पना तरुण अथवा तरुणी स्वतःच्या पायावर उभे रहाणे अर्थात स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यास सक्षम होणे याच्याशी निगडीत आहे. ज्यावेळेस ही पात्रता येईल लग्न करा. 
सध्याच्या शिक्षण पध्दतीमुळे जर हे वयच ३०+ होत असेल, तर लग्न ही सामाजिक समस्या होऊन बसली तर त्यात नवल ते काय ? 
मग यात जोडीला आर्थिक स्थैर्य, आवडनिवड, जात-पात आदी मुद्दे जोडत गेले तर मग हे अधिकाधिक कठीण होत जाते . 
लग्न या समस्येच्या कडे पाहायचे असेल तर शिक्षण या क्षेत्रातील मूर्खपणा संपवणे आवश्यक आहे. 
समाजाच्या निम्न स्तरात बघा. त्यांच्यात लग्न लवकर होते. मुले लवकर होतात. आणि हे चक्र त्यांचे आजही जुन्या पद्धतीनेच चालू आहे. मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला हेच चित्र दिसेल. 
ब्रिटीश हे कोणत्याही प्रकारे आपल्या देशाचे हितचिंतक नव्हते.. त्यांनी केलेली प्रत्येक सुधारणा त्यांच्या स्वार्थाच्या पायी होती. ज्याप्रमाणे मुस्लीम आक्रमकांनी या देशाला लुटले आहे तेच काम ब्रिटिशांनी गोड बोलून केले आहे.. 

ब्रिटीश आणि मुस्लीम दोघेही लुटारुच. ब्रिटीश थोडे टापटीप संभावित.. त्यांनी लुटताना आपल्या संपत्ती निर्मिती यंत्रणेचा गळा पण घोटला आणि आपल्याला बौद्धिक पातळीवर भ्रमित केले. त्याचा परिणाम आपण अजूनही भोगतो आहोत.   
त्यांनी  प्रत्येक व्यक्तीच्या मनात न्यूनगंड पेरला. आपली सामाजिक आर्थिक चौकट पूर्ण उध्वस्त केली. 
ब्रिटिशांनी ज्यावेळी देश ताब्यात घेतला होता. त्यावेळी आपल्या चलनाचे मूल्य होते १ रुपयाला १८ डॉलर. जागतिक व्यापारात आपला वाटा होता २३ % 
ही समृद्धी त्या देशाची होती ज्याला ८ व्या शतकाच्या पासून पुढील १००० वर्षे वारंवार लुटले गेले होते. म्हणजे आपली मूळ समृद्धी काय असेल ? 
ब्रिटिशांनी देश सोडला त्यावेळी आपल्या १ रुपयाचे मूल्य १ डॉलर झाले होते. इतके आपल्याला ब्रिटिशांनी लुटले आहे. 
आज आपल्या चलनाचे मूल्य १ रुपया = १/७५ डॉलर झाले आहे. अर्थात ७० वर्षात आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला ७५ पट नागवले आहे. 
समानतेच्या नावाखाली सगळ्या लोकांना जातीचा शार्प अभिमान शिकवला पण जातीच्या पारंपारिक व्यवसाय हा गौण आहे हे मेंदूत भरले. परिणाम काय ? जातीचे स्कील संपूर्ण संपले, उरला आहे पोकळ अभिमान आणि समानता नावाच्या गोंडस चरकात चिरडून जाणारी आयुष्ये. 

*प्रत्येकाला आपल्या जातीचा कट्टर अभिमान आहे. पण त्याचे जात वैशिष्ट्यानुसार असणारे कौशल्य संपून गेले आहे याची त्याला खंत नाही आणि समानता देणाऱ्या राज्य घटनेत मात्र त्याला जातीनिहाय आरक्षण हवे आहे.*  जेणेकरून त्याला येणाऱ्या पिढ्यांना मँकाले च्या शिक्षण पद्धतीत पोट भरण्याची संधी शोधता येईल... 
कस्तुरी मृगाच्या पेक्षाही दयनीय अवस्था आज आपल्या सगळ्यांची झालेली आहे. 
आपल्या पूर्वजांनी जे सुखी समाधानी तृप्त आणि ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगले ते सगळे थोतांड होते. ते सगळे त्यांचे शोषण होते हे उच्चारवाने सांगणारे ब्रिटीश आणि ब्रिटीश धार्जिणे समाजसुधारक सांगत होते. त्यावर विश्वास ठेवून संपूर्ण समाजाची शोचनीय अवस्था झाली आहे. 
*जुन्याची नाळ तुटत नाही पण तिच्याबद्दल नकारात्मक भाव निर्माण केला गेला आहे आणि नवीन जे आहे त्यात भवितव्यच दिसत नाही म्हणून तिथे आरक्षणाची भिक मागायची वेळ आली आहे.* 
पण त्यातून तरी काय हशील होणार आहे ? 
चपराशाच्या नोकरीसाठी Phd डॉक्टर पासून सगळ्यांचे लाखांनी अर्ज येतात. 
संपूर्ण समाज त्रिशंकू झाला आहे.
    
मी यात कुठेही उच्च शिक्षण किंवा उत्कृष्ट काही करण्याची आस असलेल्या लोकांचा द्वेष करत नाही. पण माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की जे सामान्य ९९९ आहेत त्यांना अशीच शिक्षण व्यवस्था असावी जी त्यांना २०व्या वर्षी स्वयंपूर्ण करू शकेल.
 दुसरा मुद्दा जे पारंपारिक कौशल्याचे व्यवसाय आहेत त्यांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. 
आज सुद्धा handmade उत्पादने वाट्टेल त्या दराने विकली जातात. 
आज सुद्धा पैठणी कोणत्याही यंत्रमाग साडीच्या काही पट महाग विकली जाते. 
धोरण दोन्ही विचारांना समजून असावे.
 धोरण हे ९९९ चा विचार करणारे असावे आणि त्या १ ला सुद्धा संधी देणारे असावे... 
जुन्या काळाला जे शिव्या घालतात त्यांना हे समजून घेणे आवश्यक होते की व्यासांच्या पासून बहुसंख्य बहुजन ऋषी त्या १ मधील होते आणि त्या संस्कृतीने त्यांना संधी दिली आणि त्यांनीच आजवर जगाला प्रकाश दिला आहे. पण त्या काळात उर्वरित ९९९ सुद्धा आपले आयुष्य आनंदाने सुखा समाधानाने जगले. 

*आज समानतेचे नाव घेत आपण संपूर्ण राष्ट्राची,राज्याची आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याची सुद्धा वीण उसवून ठेवली आहे.* 
*यावर गांभीर्याने विचार करा...*🙏🏻

Sunday, 7 February 2021

यज्ञ

🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵
       *!! यज्ञ- !!*
*खूप खूप खूप महत्वाचा लेख आहे हा. अवश्य वाचा.* 
यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे. सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते, निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यु ह्या प्रवासात्त त्या समाविष्ट केलेल्या आहेत व त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत वा आयुष्यहोम हा यज्ञ वा होम मुलाच्या जन्मापासून ते पुढील आयुष्यप्रवास निरोगी व्हावा ह्याकरता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, दीर्घायुष्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जाहोम, घरासाठी वास्तूशांत इ. करण्यास सांगितले आहेत.

पण हे झाले छोटे यज्ञ.समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रुद्रयाग, पर्यावरणासाठी सोमयाग, पर्जन्ययाग ह्यासाठी प्रसंगारूप मोठे यज्ञ केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱ्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून अग्नीप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, सालीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार इ. वृक्षांच्या खाली पडलेल्या कांड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास 3 ते 4 तासाचा अवधी व मोठा यज्ञपूर्ण करण्यास 3 ते 7 दिवस अवधी लागतो.आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता 'अग्निहोत्र'ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधले. सर्व यज्ञात जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. ह्या सर्व यज्ञात मनःशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश "अग्निहोत्र'ने सुद्धा लाभू शकतात हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिध्द करण्याचे काम आम्ही गेले 5-6 वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यापर्यंत देण्यासाठी हा लेखनप्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.

"अग्निहोत्र' हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी 10 मिनिटात करता येतो.ह्या यज्ञाला जास्तीत जास्त रु. 3/- ते रु. 5/- इतका खर्च येतो.अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळाउपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र२. गाईच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे३. गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५ तुकडे४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे ४-५ ग्रॅमसूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम्नमम || हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे.अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ. अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले. 

अग्निहोत्र प्रयोगाची खालील उदिष्ट्ये ठरवण्यात आली...१. अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल२. अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम३. अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम४. अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीवर होणारा परिणाम५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म६. अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण.हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली व त्यासाठी प्रज्ञा विकास मंचाच्या 'फ्रॉस्ट' ह्या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्स मीटरच्या साह्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ 90% सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले.प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले.रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात होते हे आढळून आले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.अवघ्या रु. ३/- ते ५/- खर्चात रोज फक्त १० मिनिटे सकाळी वा संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतू विरहीत करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो- हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून, जागतिक वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध करू शकलो व जगात आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ह्यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी "मिनरल वॉटर" इतकं शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता सर्वानीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी नबाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे. 

ह्या अभ्यासा दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, पोलंड, झेकस्कलोकोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्विझर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Home Farming Technique असे नावही दिले आहे.दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातूशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली आपला झोपी गेलेल्या, गुलामगिरी मानसिकतेच्या शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत.परवाच महालक्ष्मी मूर्तीवरती मूर्ती संवर्धनासाठी कोल्हापूरी लेप चढवण्यात आला. तो लेप आपल्या पूर्वजांनी 'वज्रलेप' म्हणून २००० वर्षापूर्वी तयार केला होता- तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. नुकतेच ह्याच महिन्यात इंग्लंडस्थित 'पॅनगयिया' ह्या कंपनीने आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या करताआपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला.आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण 'कथिलाचा वाळा' हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.

प्राकृतिक ओठ

काळे ओठ प्राकृतिक गुलाबी, मुलायम आणि आकर्षक करण्याचा आयुर्वेदातील सर्वोत्तम उपाय :

हा एक ठेवणीतला उपाय आहे, जो आज मी आपणापुढे प्रस्तुत करत आहे.

अनेक महिला व पुरुष नाकी डोळे खूप छान असतात, चेहराही उजळ असतो परंतु ओठ काळे असतात अथवा ओठांवर काळे / सफेद दाग, धब्बे असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या सौन्दर्यात हा एक दाग असल्यासारखा वाटतो. किंबहुना त्यांनाही ही गोष्ट आवडत नाही. 

महिलांना तर ही गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवते. असे काळे ओठ झाकण्यासाठी महिला ओठांवर लिपस्टिक चा वापर अधिक करतात. असे केमिकल युक्त पदार्थ ओठांचे मूळ सौन्दर्य अजून खराब करते. मी मागेही सांगितले, कोणत्याही सौन्दर्य प्रसाधन साहित्यात अनेक रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात जे ओठांच्या नाजूक त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असतात. तात्पुरते सौन्दर्य खुलवण्यासाठी या रासायनिक भेसळ साहित्यापासून दूर राहून आपल्या प्राचीन आयुर्वेदात सांगितलेल्या उपायांचा वापर नेहमी करावा. याने कोणत्याही प्रकारची हानी होत नाही शिवाय ओठ अतिशय सुंदर आणि आकर्षक होतात.

फक्त थोडीशी मेहनत आवश्यक असते.

काही व्यक्तींना जन्मजात असे काळे ओठ प्राप्त होतात तर काहींना गंभीर आजारातून बाहेर पडल्यावर औषधांच्या ऍलर्जीच्या माध्यमातून अशा समस्येला सामोरे जावे लागते.

कारण कोणतेही असो....
हा आयुर्वेदातील सर्वोत्तम उपाय करून पहा.

यासाठी तुम्हाला पुढील साहित्य हवे जे अतिशय किरकोळ आणि सहज उपलब्ध होणारे आहे.

०१) ग्लिसरीन ( मेडिकल मध्ये सहज उपलब्ध होते )

०२) लिंबाचा रस.

०३) पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी वापरण्यात येणारा टूथ ब्रश.

एका स्वच्छ काचेच्या बाटलीत ग्लिसरीन 5ml व लिंबाचा रस 5ml एकत्र मिसळावा. हे मिश्रण तुम्ही सात दिवस वापरू शकता. हे मिश्रण संपले की पुन्हा याच प्रमाणे नवीन तयार करून पुढील सात दिवस वापरा.

सकाळी उठल्यावर दात घासून झाले की लहान मुलांच्या टूथब्रश वर हे लिंबू मिश्रित ग्लिसरीन घेऊन ओठांना सावकाश घासणे. यामुळे ओठांवरची पहिली लेअर साफ होते व ओठांची त्वचा कोमल, मुलायम होते.

तोंड बंद करून हे ग्लिसरीन थोड्या वेळ ओठांवर हलक्या हाताने घासावे. तोंडात जरी हे द्रावण गेले तरी अडचण नाही कारण ग्लिसरीन हानिकारक नसते. 

त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. दुधाच्या साय मध्ये अगदी किंचित हळद पावडर टाकावी व हे मिश्रण एकजीव करावे. ही हळद मिश्रित साय देखील तुम्ही पुढील सात दिवस वापरू शकता. फक्त एक काळजी घ्या ही साय अगदीच हलकी पिवळी दिसेल एवढीच हळद त्यात मिसळा. ही साय ओठांवर एक लोशन म्हणून लावावी व किमान दोन तास तरी ठेवावी. त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने ओठ साफ करू शकता.

भाजी मंडई मध्ये बिट हे बाराही महिने मिळते. बिटाचा एक छोटा तुकडा कापून तो ओठांवर किमान पाच ते दहा मिनिटे घासावा. बिट मध्ये जो लाल रंगाचा रस असतो तो ओठांच्या कोमल त्वचेसाठी खूपच उपयुक्त असतो.

बिटाचा तुकडा तुम्ही दिवसभरातुन कधीही ओठांवर घासू शकता. एखादेवेळी बिट उपलब्ध नसेल तरी हरकत नाही मात्र वरील दोन उपाय नियमितपणे करायचे आहे.

तसेच सकाळी एकदा व रात्री झोपण्यापूर्वी एकदा वरील दोन्ही प्रयोग सलग काही दिवस न कंटाळता नियमपूर्वक करायचे आहेत.

आपणास या उपायाचा काय फरक जाणवला मला अवश्य कळवा.

धन्यवाद,

Vedas

Why I Love Vedas?

1. Because Vedas clearly state that the first religion is “Loyalty towards motherland”.

Everything else – being Hindu, Muslim or Christian – comes next. Some religious cults teach to turn traitors when an enemy nation attacks motherland just because enemy follows my religion. Communists in India were supporting China during 1962 war simply because Karl Marx is dearer to them than Mother India. Vedas have no place for this treachery. In fact, the concept of Motherland or Matribhoomi or Bharat Mata or Maa Tujhe Salaam or Vande Mataram has its origin in Bhoomi Sukta of Atharva Veda.

2. Because Vedas encourage Apostasy.

Unlike later era cults where punishment for apostasy (rejecting prevailing faith privately or publicly) is death, Vedic culture hails those who question prevailing religious or social practices as Gods, Bhagwans, Avatars or Saints. Thus Gautama Buddha, Guru Nanak, Sant Kabir and Swami Dayanand Saraswati – all are considered as icons of Dharma or spiritualism. The basic premise is simple and rational – unless society encourages people to think freely, out of the box, originally and question present conditions, how can there be improvements, progress and innovations? That is why we see that the societies where apostasy is punished are among the most uncivilized terror-prone hells on earth. Entire Europe was in lawless darkness till Pope held dominance. One clearly knows what’s the situation in countries of Africa, Middle East and our next door neighbors.

3. Because Vedas are the first source of wisdom known to humankind.
No one has been able to reasonably date them. All we know is that whatever period we look back in documented past; there is no evidence that the Vedas were not exist able.

4. Because Vedas have been meticulously preserved in such a systematic manner that the original Vedas are still available to us in same pristine form.
Not just words but even pronunciation and intonations. Quite a wonderful human feat given that the Vedas has more than 20,000 verses. A reason to congratulate ‘being human’!

5. Because Vedas are the only spiritual texts I am aware of that are devoid of stories, miracles, history or a founder we must blindly surrender to. A rare advantage being the only true pre-historic texts.

6. Because Vedas are comprehensive. They contain not just spiritual wisdom, but sufficient insights in practical life as well – science, technology, medicines, health, society, family, economics, mathematics, finance, research, education and so on.
I am yet to find a subject not covered in Vedas.

7. Because Vedas do not spoon-feed.

They instead encourage research and exploration. They give hint and demand humans to discover the rest through efforts.

8. Because Vedas do not demand blind-belief.

Vedas are the only religious texts I am aware of that have no punishment for blasphemy. All that Vedas demand is a sincerity to discover and embrace whatever one realizes as truth to best of his or her understanding. So even if you reject Vedas as bogus, Vedas encourage that, so far your intentions are honest. There is no punishment, no death sentence, no divine wrath, no threat for rejecting Vedas fully or partially unlike many religious cults.

9. Because Vedas do not demand belief in unseen and unverified.

They are based on premise that all source of wisdom lies within each of us. Through practice and will-power, one can unravel that source of knowledge. So instead of blind faith on anything, one should attempt to discover the wisdom within through efforts, contemplation, good deeds and knowledge-seeking.

10. Because Vedas are truly universal.

They belong to an era when there was no Hindu, Muslim, Christian, Jew, Communist blah . Vedas alone can be foundations of a truly universal religion that unite all human beings and destroy divisions on basis of later-era man-made religions.

11. Because Vedas have no place for superstitions.

Vedas encourage scientific thinking. They urge us to reject whatever is based merely on tall claims and does not stand the test of reason.

12. Because Vedas have no concept of disbelievers.

Vedas urge us not to believe in some person, book or concept just because a lot many people follow them. Instead Vedas extol us to stand like brave warrior for whatever seems true to our own heart to best of our egoless intentions.

13. Because Vedas demand all humans to have equal social, political, spiritual, religious and educational rights irrespective of gender, birth, caste, region or religion.

14. Because Vedas recommend merit to be the only factor for differentiation. And be sensitive to protection of rights of differently-able.

15. Because Vedas consider women as source of goodness on earth.

16. Because Vedas do not ask us to believe in Heaven, Hell, Adam, Eve, Angels, Judgment Day, Prophets, Ghosts or Satan

Monday, 1 February 2021

Budget 2021

*Budget 2021; टॅक्स ऑडिटची मर्यादा दहा कोटींवर*
💰 अर्थमंत्री यांना करधारकांना दिलासादेण्याचा प्रयत्न केला आहे. टॅक्स ऑडिटची मर्यादा दहा कोटींवर नेली आहे.

◻️ टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरून दहा कोटींवर
◻️ एनआरआय नागरिकांना दुहेरी करांतून मुभा मिळणार
◻️ ७५ वर्षांवरील पेन्शनधारक नागरिकांना रिर्टन भरण्याची गरज नसणार
◻️ गुंतवणूक वाढीसाठी कॉर्पोरेट करामध्ये कपात करणार
◻️ जुन्या कर कपात तपासणीसाठी सहा ऐवजी तीन वर्षाचे रेकॉर्ड पाहिले जाणार
◻️ लाभांशमधून मिळणार्‍या उत्पन्नांच्या करात कपात करणार
◻️ स्टार्ट अपमध्ये गुंतवणूकदारांना दिलासा  
◻️ पीएफ उशिरा भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही
◻️ जीएसटी प्रणाली आणखी सोपी करणार
◻️ डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र सरकराने १५०० कोटींची तरतूद
◻️ २०२०-२१ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के

🪙 अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2021 सादर करताना टॅक्स स्लॅपमध्ये कोणतीही सुटची घोषणा केलेली नाही. करसंरचनेत कोणताही बदल केलेला नाही. 

👉🏻 त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच कर भरावा लागणार आहे. 

▫️याशिवाय गृहकर्जाच्या दिड लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजात सूट कायम ठेवली आहे. 

▫️दरम्यान अर्थसंकल्प सादर होत असतानाच शेअर बाजारात वाढ झाली आहे. 

✅ शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य, कर, खाजगीकरण आदी मुद्यांवर हा अर्थसंकल्प राहिला. 

माका अर्थात भृंगराज

माका अर्थात भृंगराज आयुर्वेदात याचा आवाज रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो. यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्...