Tuesday, 29 October 2019

संत

महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी दया, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभाव यांची शिकवण दिली. कोणी लहान मोठा नाही सर्व सारखे समान आहेत अशी भावना समाजात निर्माण केली.

संत नामदेव : संत नामदेव हे शिंपी होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व समाजात जागृती निर्माण केली. ज्ञानेश्वराबरोबर त्यांनी महाराष्ट्रात आणि ज्ञानेश्वरानंतर पूर्ण भारत भर समतेचा संदेश दिला. 

संत ज्ञानेश्वर : ज्ञानेश्वर हे नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते. ते आपेगावचे राहणारे होते. सण १२७५ मध्ये त्यांचा जन्म झाला. निवृत्तीनाथ व सोपानदेव यांचे ते छोटे बंधू होते. मुक्ताबाई हि त्यांची बहीण. त्यावेळची कर्मठ लोकं त्यांना संन्याशाची मुले म्हणून नवे ठेवत, त्याचे कारण असे कि त्यांच्या वडिलांनी घर सोडून संन्यास घेतला होता. पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना चार मुले झाली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्यांच्या मुलांचा लोक छळ करत होते. 
ज्ञानदेव एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले आणि झोपडीचे दार बंद करून दुःख करत बसले होते. इतक्यात तेथे मुक्ता तेथे आली आणि गवताच्या ताटीवर टिचक्या मारत " ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आहो,आपण दुख्खी कष्टी होऊन कसे चालेल ? जगाचे कल्याण कोण करेल? मुक्ताईच्या उपदेशाने ज्ञानेश्वराला हुरुप आला. सर्व दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गरीब आणि मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेंव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांना कळकळीचा उपदेश केला, " ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दुख्खी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीशे करा" त्यांचा उपदेश सातशे वर्षांपासून लोकांना मार्गदर्शन करत आहे. 
        त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती. त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी होती.  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतून फार मोठा ग्रंथ लिहला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले करून दिले. लोकांना समतेची व बंधुभावाची शिकवण करून दिली. 

संत एकनाथ :  संत ज्ञानेश्वर व नामदेव यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली.  संत एकनाथ पैठण चे राहणारे होते त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यासाठी अनेक अभंग, ओव्या आणि भारुडे लिहली. कोणताही उच्च नीच भेदभाव मनू नका आसा उपदेश त्यांनी लोकांना केला. भक्तीचा मार्ग लोंकाना दाखवला गोरगरीब मागासलेल्यांना त्यांनी जवळ केले मुक्या प्राण्यांवर दया करा प्राणिमात्रांवर प्रेम करा असा संदेश त्यांनी दिला. 
         एके दिवशी ते गोदावरी नदीवर अंघोळीसाठी चालले होते. दुपारची वेळ होती. कडक ऊन पडले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक महाराचे पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला त्यांनी इकडे तिकडे पहिले आणि धावत मुलाजवळ गेले आणि त्याला उचलून घेऊन त्याच्या घरी पोहचवले. अश्या प्रकारच्या त्यांच्या आचरणातून  संत एकनाथांनी समतेची व ममतेची शिकवण समाजाला दिली. 

संत तुकाराम : शिवाजीमहाराजांच्या काळात संत तुकाराम व संत रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावाचे राहणारे. त्याच्या घरी शेती भाती होती. किराणा मालाचे दुकान होते, परंतु तुकाराम संसारात रमले नाहीत. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, अभंग रचत व ते लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. तुकाराम त्यांना दया, क्षमा, शांती यांची शिकावन देत. 
                       जे का रंजले गांजले । त्याशी म्हणे जो आपुले ।
                      तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा "
हा संदेश त्यांनी लोकांना दिला. लोकांच्या मनात चांगले विचार जागे केले. आजही महाराष्ट्रात ग्यानबातुकाराम चा जयघोष ऐकू येतो. 

संत रामदास स्वामी : संत रामदास स्वामी यांचा जन्म मराठवाड्यात जांब गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासाचे नाव नारायण होते पण ते स्वतःला रामाचा दास म्हणजेच रामदास म्हणून घेऊ लागले. महाराष्ट्रात जय जय रघवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमू लागली होती त्यांच्या दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा संदेश दिला तशेच मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद् विचार आणि सद् वर्तन यांची शिकावंन  दिली. बलोपासनेसाठी त्यांनी ठीक ठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले.  " सामर्थ आहे चवळीचे जो जो करील तयाचे" हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संगठीत होण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्पुर्ती दिली. 

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
     माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
     मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
      माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.

स्वदेश

        मित्रांनो एक  प्रश्न प्रत्येक भारतीयांनी स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे की रुपयाचे अवमूल्यन का होत आहे ? रुपयाची किंमत कशी वाढवता येईल ?
        ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस डॉलर ची आणि रुपयाची किंमत एकसमान होती मग आज या दोन्ही मध्ये एव्हडी तफावत का पाहावयास मिळत आहे? त्याचे कारण काय असावे असे आपल्याला वाटते ? रुपयाची किंमत कमी असणे म्हणजे आपण जे काम करतो त्याची गुणवता कितीही चांगली असली तरीही त्याची किंमत मात्र कमीच असेल हा एक प्रकारचा अन्याय आहे
         या दोन्ही मधील तफावत कशी दूर करता येईल याचा अनेक थोर भारतीयांनी प्रयत्न केला आहे; महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला होता राजीव दीक्षितांनी स्वदेशी चळवळ सुरु केली होती.
          स्वदेशी च्या नावाखाली देशवाशियांची लूट करणे म्हणजे स्वदेशी नव्हे. मला असे वाटते कि देशाबद्दल प्रेम, आभिमान हा प्रत्येक देशवाशीच्या मनात असायला हवा. आपल्याकडे आहे म्हणून पैश्यांची लूट करणे हे योग्य नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आहे. स्वदेशी चा स्वीकार हा प्रत्येकाने करावा स्वदेशीला प्राधान्य द्यावे ज्या गोष्टीला पर्याय नाही ती गोष्ट खूप गरजेची असेल तरच घ्यावी.
           स्वदेशी म्हणजे बाहेरील वस्तूंचा बहिष्कार करा असे माझे म्हणणे नाही; परंतु जास्तीत जास्त देशी उत्पादने वापरण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयांनी करावा.
            स्वदेशीचा जास्त वापर केल्यामुळे आपल्याकडे रोजगार निर्माण होतील आणि आपल्याच देशातील तरुण, शेतकरी, कामकरी, कामगार, व्यापारी सर्व वर्गातील लोकांना रोजगार मिळेल; हि कोणा एकाची किंवा सरकार ची जवाबदारी नाही तर प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.
            आपल्या देशातील शेतकऱ्यांना जर आपण मदत केली तर आपण पूर्ण देशवासीयांना विषमुक्त अन्न खाऊ घालू शकतो आणि पूर्ण जगालाहि पुरवू शकतो आणि या मधून देश समृद्ध होण्यास नक्कीच मदत मिळेल. असे मला वाटते. भारत हा कृषिप्रधान देश आहे म्हणून शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे कृषी मंत्री हा शेतकरी असावा शेतीवर आधारित उद्योग धंद्यांना सरकार प्रोत्साहन द्यावे. भारतीय वस्तू एक ब्रँड म्हणून विकल्या जाव्यात त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्तेला नक्कीच मिळेल.
             प्रत्येक भारतीयाने बचतीचे महत्व समजून घ्यावे व आपण किती कमावतो त्यापेक्षा आपण किती बचत करतो हे शिक्षण पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. कोण किती खर्च करतो याची स्पर्धा नसावी तर कोण किती बचत करतो याची स्पर्धा असावी.
              राजीव दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे टीव्ही पाहणे टाळावे कारण टीव्ही आपल्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टीचा भडीमार करत असतो ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही त्या गोष्टी आपल्याला प्रतिष्ठेच्या वाटायला लागतात; जिवंत माणसांपेक्षा निर्जीव गोष्टीना आपण महत्व देतो.
               सर्व देशवासीयांनी मी आगोदर भारतीय आहे हे प्रत्येक मान्य करावे आणि मग जात धर्म पंथ काय आहे याचा विचार नंतर करावा त्यामुळेच आपण अनेक जात धर्म पंथ वेगवेगळे असले तरी एका गोष्टीमुळे आपण एकत्र एक आहोत तो म्हणजे आपला देश आहे. "अनेकता मे एकता हिंद कि विशेषता, हम बुलबुले है इसकी यह गुलसिता हमारा।"
               मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणाचाही तिरस्कार करायचा नाही तर आपल्याला आपल्या देशावर आपल्या देशबांधवांवर प्रेम करायचे आहे दुसऱ्याचा तिरस्कार करणे हि आपली संस्कृती नाही "अतिथी देवो भव" हि आपली संस्कृती आहे.
               दुसऱ्या देशातील प्रॉडक्ट विकणे आणि ते विकणायचे शिक्षण देने हे आपल्याला घातक आहे हि शिक्षण पद्धती आपल्याला गुलाम बनवत आहे. आपल्या देशातील शेतकऱ्याच्या मुलांना शेतीचे शिक्षण दिले जात नाही हि खेदाची गोस्ट आहे.
               भारत माझा देश आहे आणि प्रत्येक भारतीय माझा बांधव आहे हे वाक्य प्रत्येकाच्या मनावर कोरले गेले पाहिजे.  जय हिंद
               जोपर्यंत आपण देशाशी एकनिस्ट होत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या देशाचा विकास करू शकणार नाहीत त्यासाठी आपल्याला आपल्या राष्ट्रपुरुषांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचा आदर्श जीवन पद्धतीचा स्वीकार करावा लागेल
             बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
             मित्रांनो आयष्यात भरपूर पैशे कमवा परंतु पैशे कमावण्यासाठी खोटे कधी बोलू नका. कारण एक खोटे बोलण्यासाठी हजार खोटे बोलावे लागणार आणि खोटे बोलणे आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे.
             पूर्वीच्या काळी जसा भारत होता तसाच भारत आपल्याला पुन्हा निर्माण करावयाचा आहे, म्हणजे असे घर असेल कि जे आपल्या बहुतेक गरजा स्वतःच्या स्वतः पूर्ण करू शकेल असे गाव असेल जे  स्वतःच्या गरजा  स्वतः पूर्ण करू शकेल आसा तालुका जिल्हा आणि राज्य असेल तर आपला देश आदर्श बनेल याचा विश्वास मला नक्की आहे प्रत्येकाने आपले घर आगोदर आदर्श बनवावे त्यामळे हे राष्ट्र आदर्श बनवणे हि एक कल्पना नाही तर ते एक सत्य असेल आणि सत्याचा विजय होईल सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य सत्यात उतरेल
               माझे विचार आपल्याला सुबुद्धी देवो आदर्श भारताच्या सर्वाना शुभेच्छा
                

Sunday, 20 October 2019

राष्ट्रवंदन

तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा |
सभी धर्म अरु पंथ  - पक्षको दिलसे रहे प्यारा  |
विजयी हो, विजयी हो, विजयी हो | भारत देश हमारा || धृ ||

निर्भय हो यह देशकी माता, मंगल कीर्ती कराने |
सत्य शील अरु निर्मल मनसे, वीरोंको उपजाने |
सद्गुणी हो यह देशकी जनता, जीवन सुख सजवाने |
रंक राव पंडीत भिकारी, सबको सुख दिलवाने ||

विजयी हो, विजयी हो, विजयी हो | भारत देश हमारा || धृ ||

स्पृश्यास्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटाने |
सबके मन कर्त्यव्यशील हो, धन उद्योग बढाने |
ब्रम्हचर्य, अध्यात्म, दैवीगुण, घर घरमें  प्रगटाने |
सारा भारत रहे शिपाही, शत्रूको दहशाने |
तुकड्यादास कहे स्फूर्ती हो, सबको भक्ती करणे |

विजयी हो, विजयी हो, विजयी हो | भारत देश हमारा || धृ ||

माका अर्थात भृंगराज

माका अर्थात भृंगराज आयुर्वेदात याचा आवाज रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो. यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्...