Tuesday, 23 March 2021

लाकडी कंगव्याचे फायदे

पूर्वी केसांना विंचरण्यासाठी लाकडी कंगवा वापरला जात असे आणि कदाचित यामुळेच लोकांचे केस अधिक सुंदर असायचे.आपनास माहिती नसेल परंतु जेव्हा केस लाकडी कंगव्याने विंचरले जातात तेव्हा केस कमी गळतात आणि कोंडा ही कमी होतो. याशिवाय लाकडी कंगवा वापरल्याने डोकेदुखी देखील दूर होते.लाकडी कंगवा वापरण्याचे हे फायदे आपल्याला आश्चर्यचकित करतील:
1. टाळूसाठी लाकडी कंगवा खूप चांगला आहे.लाकडी कंगव्याने केसांची वाढ चांगली होते आणि टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुद्धा वाढते.
२. लाकडी कंगव्याच्या वापराने केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. हे केसांची गुणवत्ता देखील सुधारित करते. या कंगवाच्या वापराने केसांची मुळे मजबूत होतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
3. लाकडी कंगवा वापरुन केसांना कोणतीही इजा होत नाही. तज्ञांच्या मते, इतर कोणत्याही कंगव्याच्या वापरामुळे केस मध्यभागी फुटतात किंवा चमक कमी होते, परंतु लाकडी कंगवाच्या वापराने केसही मध्यभागी मोडत नाहीत किंवा चमकही जात नाही.
4. जर आपल्या केसांमध्ये कोंडा खूप जास्त असेल तर हा कंगवा वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. लाकडाच्या कंगवाच्या वापराने तेलाच्या ग्रंथी उघडतात, ज्यामुळे टाळू कोरडी होत नाही आणि कोंडाची समस्या देखील दूर होते.
5. बर्‍याच लोकांचे टाळू खूप संवेदनशील असतात. अशा लोकांना लाकडी कंगवा वापरणे खूप फायदेशीर आहे.या व्यतिरिक्त अशी बरीच लाकूड (जसे की कडुनिंब) देखील वापरल्यामुळे डोकेदुखी कमी होते. कोम्बिंग दरम्यान, लाकडाचा अर्क टाळूच्या माध्यमातून शरीरात जातो, ज्यामुळे डोकेदुखीसारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो.

Monday, 22 March 2021

खाद्यतेल.... कोणते? किती? कसे खावे?

*खाद्यतेल.... कोणते ?? किती?? कसे खावे ??*
(याबाबतीत माहितीपुर्ण लेख)

 पूर्वीच्या काळी जिलेबीची  ताटेच्या ताटे सहज फस्त करून ,पचवणारे अनेक लोकं  सहज आढळतं  , पण आता मात्र तळलेला पदार्थ म्हटला ,की *कोलेस्टेरॉल*  नावाचा बागुलबुवा सगळ्यांसमोर उभा राहतो आणि खाण्यातली सगळी मजाच निघून जाते !

 खरं म्हटलं तर पुरी ,पापड,वडे,भजी, जिलबी यासारख्या तळलेल्या पदार्थामुळे जेवणाला एक वेगळीच लज्जत येते. 

त्यामुळे कोणते तेल वापरायचं ? किती वापरायचं ?

पदार्थ तळलेला चालेल ? की परतलेला ?,की नुसती फोडणी द्यावी ? तेल कोणते खावे? किती खावे? 

 हे सर्व  health counsious असलेल्या घराघरात चर्चेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि तेवढेच ज्वलंत विषय झालेले आहेत.

 आयुर्वेद शास्त्रानुसार *तेल* असा शब्द आला तर तिळाचे तेलचं अभिप्रेत असते.

 वेगळे कुठले तेल म्हणायचे असेल तर मोहरीचे,जवसाचे तेल असा उल्लेख येतो. *घृत ,तेल,वसा आणि मज्जा* अशा चार प्रकारचे मुख्य स्निग्ध पदार्थ आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्यापैकी *घृत*  म्हणजे *साजूक तूप* हे सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच्या खालोखाल नंबर लागतो तेलाचा. त्यातही *तिळाचं तेल हे सर्वश्रेष्ठ* मानलेले आहे .तूप ,वसा आणि मज्जा हे तीनही स्नेह प्राणिज आहेत आणि 'तेल' हा एकच स्निग्ध पदार्थ वनस्पतीपासून मिळतो.

*तेल हे परम वातशामक आहे* तेलाच्या स्निग्धता उष्णता,स्थिरता  अशा गुणांमुळे , शरीरात वातदोष वाढला असता येणारा कोरडेपणा, खरखरीतपणा, थंडपणा, अस्थिरपणा हे तेलामुळे कमी होतात. आपल्या शरीरातील बहुसंख्य घटक हे स्निग्ध पदार्थापासून निर्मित आहेत व त्यांचे पोषण करण्यासाठी आहारात स्निग्ध द्रव्यांची नितांत आवश्यकता असते.

 सध्या बिन तेलाच्या चपात्या,अगदी कमी तेल असलेल्या किंवा पाण्याच्या फोडणीच्या भाज्या, पाव बिस्किटे असा रुक्ष आहार,  हल्ली त्वचेला बाहेरूनही  तेलाचा स्पर्श फारसा होतंच नाही आणि मनातही कुणाबद्दल स्नेह नाही ,असा एकूणच कोरडा व्यवहार समाजात वाढत चाललेला दिसत आहे. त्यामुळे वार्धक्यात वातदोष वाढल्यामुळे  शरीरात होणारे बदल , जे सामान्यपणे सत्तरी नंतर दिसतात, ते हल्ली फार लवकर म्हणजे चाळीस-पन्नास च्या सुमारास घडताना दिसत आहेत. *यामध्ये  स्निग्ध पदार्थांचा अभाव हे महत्त्वाचे कारण  आहे.* सांधे दुखणे, त्वचा कोरडी, भेगाळलेली असणे,  केस गळणे, झोप शांत न लागणे, मन चंचल होणे ,विस्मरण असे अनेक दुष्परिणाम, योग्य स्निग्ध पदार्थांच्या अभावामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. म्हणूनच तेलाचा आहारात योग्य उपयोग करणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. फक्त तेल वापरताना काही गोष्टींची काळजी मात्र जरूर घेतली पाहिजे .

स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे हा प्रश्न हल्ली बऱ्याच गृहिणींना पडलेला असतो ,पण थोडे बारकाईने निरीक्षण केले, तर असे लक्षात येते की, भारतामध्ये पूर्वीपासूनच ज्या प्रदेशात जे पीक उपलब्ध आहे ,तिथे ते तेल वापरण्याचा स्वाभाविक प्रघात होता. अगदी आत्ताही उत्तरेकडे सामान्यपणे तिळाचं तेल व थंडीच्या दिवसांमध्ये मोहरीचे   (सरसोचे) तेल हे पिढ्यानपिढ्या वापरले जाते. दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणाऱ्या नारळाचे तेल ,सरसकटपणे स्वयंपाक करणे,अंगाला- डोक्याला लावणे व अन्य सर्वच उपयोगासाठी वापरले जाते.  महाराष्ट्र , गुजरात या भागांमध्ये भुईमुगाचे तेल वापरण्याची अनेक वर्ष परंपरा आहे व ती अतिशय योग्य आहे .यामागे आयुर्वेदातील एक सामान्य तत्व आहे, की  *जिथे जे मोठ्या प्रमाणात पिकते ,ते तिथल्या लोकांच्या आहारात वापरण्यासाठी योग्य असते*. त्यामुळे जेवण बनवण्यासाठी, आपण ज्या प्रदेशात राहतो तिथे पारंपारिकरित्या जे तेल वापरतात ते आपल्यासाठी सुद्धा योग्य आहे अशी खूणगाठ बांधावी.भारतात राहून ऑलिव्ह ऑईलची गरज नाही, हे आत्त्तापर्यंत सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल .

 या सगळ्या  सुव्यवस्थेत गडबड केव्हा झाली,  तर जेव्हा आपण पूर्वीपासून जे कच्च्या घाणीचे  (कोल्ड कॉम्प्रेस्ड) तेल वापरत होतो, त्याठिकाणी  रिफाइंड  तेल वापरायला लागलो तेव्हापासून !

 कोलेस्ट्रॉल वाढणे,स्थौल्य,ह्रुद्रोग इत्यादी  दुष्परिणाम रिफाईंड  तेलाच्या वापरामुळे लोकांमध्ये दिसू लागले आणि दोष मात्र  विनाकारण आपल्या पारंपरिक तेलांना दिला गेला.  एकेकाळी आपल्या कोकणात घरोघरी वापरण्यात येणाऱ्या गावठी खोबरेल तेलाला त्यातील saturated fats मुळे , व्हिलन मानण्यात आले होते, आज त्याच खोबरेल तेलाचे गुण लक्षात आल्यावर, पाश्चात्य लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

  तेलाच्या बाबतीत  अजून काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.  तेल जेवढे जास्त गरम होईल किंवा जितका जास्त काळ गरम होत राहील ,तेवढे त्यामध्ये घातक बदल होतात .त्यामुळे खाण्यासाठी कच्च्या घाणीवर काढलेले किंवा कोल्ड कॉम्प्रेस्ड पद्धतीने काढलेले तेल वापरणे सुरक्षित आहे. हे तेल काढताना मोठ्या प्रमाणावर तापमान वाढत नाही ,त्यामुळे त्यात शरीरासाठी घातक असणारे बदल होत नाहीत. 

घाणीवर काढलेल्या तेलाला, लवकर खवट वास येतो आणि ते लवकर खराब होते , त्यामुळे त्याच्यावर **हायड्रोजनेशनची* प्रक्रिया करून, हे तेल, रिफाईंड तेल या स्वरूपात बाजारात येऊ लागले, जेणेकरून दीर्घकाळपर्यंत त्याचा साठा करून ठेवता येईल. पण हीच रिफाइंड करण्याची प्रक्रिया आरोग्यासाठी मात्र अतिशय घातक आहे आणि त्यातूनच शरीरात अनावश्यक मेद जमण्याची प्रक्रिया चालू होते . 

कच्च्या घाणीचे तेलही, शक्यतो कच्च्याच  स्वरूपात वापरावे . म्हणजेच कोरड्या चटणीवर वरून घेणे,  उकडीवर घेणे, भाकरीला लावून खाणे उत्तम !. तेल अशा स्वरूपात वापरल्यास, त्यामुळे शरीराला आवश्यक स्निग्धता तर मिळतेच, पण अनावश्यक चरबी वाढत नाही.

 दुसरा प्रकार आहे 'फोडणी देणे ' . फोडणी करताना सुद्धा, तेल गरम होऊ लागताच, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद अशा गोष्टी घातल्या जातात आणि लगेचच त्यावर भाजी किंवा वरण टाकण्यात येते , त्यामुळे तेल जास्त काळापर्यंत उकळत नाही. त्यामुळे 'फोडणी' हा तेल वापरण्याचा, उत्तम आरोग्यदायी व रुचकर पर्याय आहे. मात्र जेव्हा तेलात तळले जाते ,तेव्हा दीर्घकाळपर्यंत हे तेल उकळत राहिल्यामुळे, त्यामध्ये शरीरात  नको असणाऱ्या ट्रान्स फॅट्सची निर्मिती होते . ही ट्रान्स फॅट्स मधुमेह, ह्रदरोग, कॅन्सरसारख्या रोगाना आमंत्रण ठरू शकतात. त्यामुळे रस्त्यावर मिळणारी वडे ,भजी खाणे, ज्याचे तेल हे दिवसातून शंभर वेळा गरम होते ,सतत उकळत राहते , अशा प्रकारचे तळलेले पदार्थ मात्र आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहेत. त्याचप्रमाणे परतण्याची क्रिया, ज्यामध्ये थोड्या तेलावर,  खूप वेळ, एखादी वस्तू परतली जाते - जसे अळूवड्या, वांग्याचे काप , मासे असे पदार्थसुद्धा शरीरात अनावश्यक मेद जमण्यास कारणीभूत असतात. 'वनस्पतीजन्य तूप' हेही त्यातील वाढलेल्या ट्रान्सफॅट्स मुळे शरीरासाठी धोकादायक असते. साजूक तुपामुळे वजन वाढते म्हणून, नाके मुरडणारे लोक, अशा प्रकारच्या वनस्पतीजन्य तूप वापरलेल्या बेकरी पदार्थ व फ्रोझन डेजर्टवर मात्र तुटून पडताना दिसतात.

 तेल आणि तेलाचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा (1 ग्राम मधून 9 कॅलरी ) मिळत असते. या ऊर्जेचा जर वापर झाला नाही तर न वापरलेल्या कॅलरी मेदाच्या स्वरूपात पोटावर, स्तन ,मांड्या या सर्व ठिकाणी जमा होतात . त्यामुळे तेल यथावश्यक खाणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर पुरेसा व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे.पूर्वीच्या काळी लोकांना भरपूर श्रमाची कामे करावी लागतं, म्हणूनही भरपूर  प्रमाणात तेल-तूप खाऊनही काहीही दुष्परिणाम फारसे दिसत नव्हते.

 विविध खाद्यतेलांविषयी आधुनिक विज्ञानामध्ये खूप संशोधन झालेले आहे. खाद्यतेलाचा विषय निघताच सॅच्युरेटेड, मुफा, पुफा , ओमेगा 3 ,ओमेगा 6 असे अनेक शब्द आपल्या कानावर आले असतीलचं

 . स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड व अन् सँच्युरेटेड असे दोन प्रकार आढळतात 22 ते 25 डिग्री तापमानाला गोठणारे स्निग्ध पदार्थ म्हणजे सॅच्युरेटेड व या तपमानाला द्रव स्थितीत राहणारे म्हणजे unsaturated असे ढोबळमानाने म्हणता येईल.    परंतु संपूर्णपणे unsaturated असणारी तेले नैसर्गिकरित्या उपलब्ध नाहीत.

Unsaturated fats हे पण दोन प्रकारचे असतात polyunsaturated (Pufa) व  monounsaturated (Mufa) .

Mufa मध्ये ओमेगा जातीची fatty acids असतात .खाद्यतेलांची निवड करताना ओमेगा 6 ओमेगा 3 फॅटी अँसिडच्या प्रमाणावर निवड करावी असे आधुनिक शास्त्र सांगते. हे प्रमाण 4 : 1 असायला हवे .

पारंपारिक भारतीय खाद्य तेलामध्ये शेंगदाणा ,मोहरी ,जवस तेल व साजूक तूप यामध्ये ओमेगा-3 व ओमेगा 6  हे गुणोत्तर आदर्श प्रमाणाच्या जवळपास आहे.

 याउलट आजकाल जाहिराती द्वारा खूप प्रचलित झालेली सूर्यफूल, करडई आणि मका या तेलात मात्र घातक ओमेगा 6 हे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेही तेले टाळणेच उत्तम. ओमेगा 6 हे प्राण्यांच्या चरबीत व  Saturated तेलात जास्त असते त्यामुळे रक्तात गुठळ्या होण्याचे आणि रक्तवाहिन्या आकुंचित होण्याचे प्रमाण वाढते, कॅन्सर, संधिवात, मोतीबिंदू ,अकाली वृद्धत्व अशा अनेक विकारांमध्ये ओमेगा 6 चा हातभार आहे.  याउलट ओमेगा-3 जातीची मेदाम्ले, आरोग्यकारक असून, ती रक्त पातळ ठेवायला, गुठळ्या कमी करायला मदत करतात.  हृदयाची गती नियमित करतात व ट्रायग्लिसराइड चे प्रमाण खाली आणतात, तसेच इन्शुलिनची परिणामकारकता वाढवतात. कॉड लिव्हर ऑईल , जवसाचे तेल बदाम ,अक्रोड यांचे तेल यामध्ये ओमेगा ३ असते. साजूक तुपात ओमेह ३ भरपूर असल्यामुळे, आहारात साजूक तुपाचा वापर, रोज एक ते दोन चमचे इतका अवश्य करावा.  मात्र साजूक तुपात तळून न खाता, गरम वरण भात, चपाती किंवा भाकरीला लावून साजूक तुपाचा उपयोग करावा.

 आयुर्वेदानुसार साजूक तूप हे सर्व स्नेहात श्रेष्ठ आहे. त्याला आज आधुनिक विज्ञानसुद्धा अनुमोदन देते आहे. 

 
तेलाची निवड बरोबर केली, की महिन्याकाठी तेलाचा वापर, प्रतिमाणशी एक किलोपेक्षा जास्त नको.  आपल्याला मधुमेह आणि हृदयविकार असल्यास, हेच प्रमाण साधारण अर्धा किलो इतके कमी असावे.  प्रत्येक व्यक्तीची त्याचे वय,कामाचे स्वरूप, राहण्याचा प्रदेश, पचनशक्ती ,चालू असणारा ऋतू यानुसार तेलाची गरज,  काही प्रमाणात बदलू शकते . जसे हिवाळ्यात शरीराला तेलाची गरज जास्त असते, म्हणून संक्रांतीच्या काळात  तिळाचे पदार्थ खाण्याची परंपरा आहे.  कोरड्या हवामानाच्या नागपूर सारख्या प्रदेशात, दमट हवामानपेक्षा स्निग्ध पदार्थांची गरज जास्त असते.  म्हणून पदार्थावर वरून कच्चे  तेल घेण्याची विदर्भात पद्धत आहे . 

काही तेलांचे विशिष्ट गुणधर्म पाहूया -

 *तिळाचे तेल*-

आयुर्वेदानुसार सर्व तेलांमध्ये तिळाच्या तेलाला श्रेष्ठ मानले आहे. तेल या शब्दाचा अर्थच तिळापासून निघालेले असा आहे. तिळाचे तेल हे शरीरामधील सूक्ष्मातिसूक्ष्म पोकळ्यांपर्यंत पोचू शकते. ते स्वभावाने उष्ण आहे,  वातपित्तनाशक, पण कफ न वाढवणारे आहे . या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे तेल कृश व्यक्तींना  पुष्टी देणारे आणि स्थूल व्यक्तींना कृश करणारे आहे . कृमिनाशक, मळ बांधून आणणारे व जसा संस्कार करू तसा गुण देणारे आहे.  त्यामुळे आयुर्वेदातील बहुतेक औषधी तेले 

बनवण्यासाठीही, तिळाचे तेलचं वापरले जाते. मात्र तीळ तेल जास्त प्रमाणात खाल्ल्यास, त्वचारोगाला कारण ठरते.

 
*मोहरीचे (राई /सरसो) तेल* -

हे तेल गुणाने उष्ण आहे व उग्र वासाचे आहे.  हिवाळ्यात वापरणे योग्य. पित्तकर व कृमिनाशक आहे . फोडणीसाठी, लोणच्यासाठी वापरतात.  उत्तरेकडे हिवाळ्यात वापरले जाते . बाहेरून लावल्यास थंडी व त्वचारोगांपासून बचाव करते. या तेलात ओमेगा 3 जातीची मेदाम्ले, प्रचुर प्रमाणात असतात, त्यामुळे हे तेल आरोग्यासाठी उत्तम आहे .

 
*जवसाचे तेल* ( flaxseed /linseed oil )-
यालाच अळशीचे तेल असेही म्हणतात. आजकाल या तेलाचे महत्त्व खूप वाढले आहे, कारण त्यामध्ये मोठया प्रमाणात  असलेले omega -3 हे मेदाम्ल. ओमेगा 3 च्या फायद्याबद्दल आपण पूर्वीच चर्चा केली आहे . ओमेगा-3 असलेले पदार्थ कमी आहेत त्यामुळे हे मेदाम्ल शरीराला सहजा सहजी मिळत नाही.  मासे, अक्रोड, बदाम,मोहरी, मेथी, जवस या पदार्थातून ओमेगा 3 मिळू शकते . ओमेगा 3 मुळे उच्चरक्तदाब, संधी विकार, कर्करोग व स्थूलता यापासुन संरक्षण मिळते स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखी आणि नैराश्‍य कमी होते ,रजोनिवृत्ती संबंधी असणाऱ्या तक्रारी  जवसाच्या सेवनामुळे कमी होतात. जवसाची चटणी किंवा जवसाचे तेल या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करावा. जवसाच्या बिया बडीशेपेप्रमाणे तव्यावर परतून, किंचित मीठ लावून, मुखवास स्वरूपातही खाता येतात. मात्र जवसाचे तेल शक्यतो तापवू नये, ते चटणीवर किंवा सलाडवर वरुन घ्यावे. तापवल्यास त्याला उग्र वास येतो व त्यातील गुणवत्ता कमी होते. सरसकटपणे, सर्वच ऋतुमध्ये ,सर्व प्रकृतीच्या लोकांनी, जवस खाणे योग्य नाही. उष्ण प्रकृतीच्या व्यक्ती , उन्हाळ्याचा काळ यामध्ये जवसासारख्या उष्ण तेलाचा वापर टाळावा किंवा अत्यंत विचारपूर्वकच करावा.

 *खोबरेल तेल* -
खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक प्रमाण आहे, त्यामुळे ते खाण्यासाठी  घातक आहे, असा चुकीचा निष्कर्ष पूर्वी काढण्यात आला होता. परंतु त्यातील  medium chain fatty acid हृदयाला हितकर आहेत व त्याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील घातक चरबी कमी होते, हे आता सिद्ध झाले आहे. saturated  fats  चेही अनेक लाभ आहेत. विशेषतः  मेंदूच्या जडणघडणीमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचा  मोलाचा वाटा आहे.  'अल्झायमर डिसीज (वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश) या आजारामध्ये खोबरेल तेल अतिशय प्रशंसनीय आहे'  ,  असे नवीन संशोधन सांगते.  त्यामुळे ज्याठिकाणी खोबरे मोठ्या प्रमाणात पिकते, अशा केरळ, कोकणासारख्या प्रदेशात, खोबरेल तेल आहारात नेहमी वापरणे योग्य आहे. त्याशिवाय अन्य लोकांनीही योग्य प्रमाणात खोबरेल तेलाचा समावेश, आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. बुद्धिदाता गणेशाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवणाऱ्या आपल्या पूर्वजांचे , अशा वेळी  कौतुक वाटल्यावाचून राहत नाही . 

असो, तेल हा विषय इतका मोठा आणि महत्त्वाचा आहे , की त्यावर कितीही पाने लिहिता  येईल,  पण लेखन मर्यादेचे भान राखून आता इथेच थांबते.

 परंतु या सर्व विवेचनावरून, कुठल्याही ही एकांगी  संशोधनावर  अवलंबून न राहता , आपले पारंपारिक ज्ञान, आपला अनुभव आणि आधुनिक संशोधन या तिन्ही गोष्टींची योग्य सांगड घालून , सर्वसमावेशक विचार केल्यास, आपण छान तेला- तुपाचे खाऊनही, निश्चितच आरोग्यवान राहू शकतो, याची खात्री तुम्हा सर्वांना पटली असेलच.

Sunday, 21 March 2021

आपले पाय मजबूत ठेवा

*आपले पाय मजबूत ठेवा - नियमितपणे चालण्याचा व्यायाम करा - अत्यंत वाचनीय लेख :*

▪️ *आपण वयाने वाढतो तेंव्हा आपले पाय नेहमी मजबूत असायला हवेत.*
▪️ *आपण जसे वृध्दत्त्वाकडे झुकत असतो* *किंवा वृध्द होतो तेंव्हा आपले केस पांढरे होणे किंवा त्वचा ढिली होणे, सुरकुतणे या नैसर्गिक गोष्टी असल्याने घाबरायचं कारण नाही.*
▪️ *प्रिव्हेन्शन या अमेरिकन नियतकालिकात* *लिहिल्याप्रमाणे आयुष्य लांबताना दिसणाऱ्या लक्षणांमध्ये पायाच्या भक्कम स्नायूंना सर्वात* *वरचे स्थान दिले आहे आणि ते महत्त्वाचे तथा आवश्यक आहे.*

▪️ *दोन आठवडे तुमच्या पायांना  हालचाल  नसेल तर तुमच्या पायांची मजबुती १० वर्षांने कमी झालेली असेल.*

▪️ *डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार असं आढळलंय की, तरूण अथवा वृध्द दोघांमध्ये पायांच्या हालचाली दोन आठवडे थांबल्यास पायांच्या स्नायूंची शक्ती एक तृतीयांशाने कमी म्हणजेच २०/३० वर्षांनी वृध्द झाल्यासारखी होते.*

▪️ *एकदा  आपल्या पायांचे स्नायू दुबळे झाले तर बरे होण्यास खूप काळ लागतो.*  *नंतर कितीही पूर्वीसारखी हालचाल करण्याचा प्रयत्न अथवा व्यायाम केला तरी फारसा फरक पडत नाही.*

▪️ *म्हणून चालण्याचा नियमित व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.*

▪️ *आपल्या संपूर्ण शरीराचे वजन/भार पायांवर पडतो किंवा पायांना पेलावा लागतो.*

▪️ *आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू खांबच आहेत.*

▪️ *गंमत म्हणजे शरीरातील ५०% हाडं आणि ५० % स्नायू आपल्या दोन पायांत असतात.*

▪️ *मनुष्याच्या शरीरातील सर्वात बळकट सांधे आणि हाडं हीसुध्दा पायांतच असतात.*

▪️ *मनुष्याच्या शरीराचा महत्त्वाचा भार वाहणारा असा एक त्रिकोण मजबूत हाडं, बळकट स्नायू आणि लवचिक सांधे यांच्यास्वरूपात तयार होतो.*

▪️ *मानवाच्या शरीराच्या ७०% हालचाली आणि आयुष्यातील शक्ती खर्ची पडते ती दोन पायांमुळेच.*

▪️ *तुम्हाला माहीत आहे का , की, तरूण माणसाच्या मांड्यांमध्ये एक छोटी मोटार कार उचलण्याइतकी शक्ती असते ?*

▪️ *पाय हे शरीराच्या चलनवलनाचा केंद्रबिंदु असतात.*

▪️ *दोन्ही पायात मिळून शरीरातील एकूण नसांपैकी ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या असतात आणि त्यांतून ५०% रक्त वाहात असतं.*

▪️ *अवघ्या शरीराला जोडणारे ते एक रक्ताभिसरणाचे मोठे जाळें आहे.*

▪️ *जेंव्हा पाय सशक्त असतात तेंव्हाच रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो. म्हणून ज्यांच्या पायांचे स्नायू बळकट त्यांचे ह्रदयसुध्दा निश्चितच बळकट असते.*

▪️ *वार्धक्य पायांकडून सुरु होऊन पायांपासून वर सरकत असते.*

▪️ *जसजसे वार्धक्य वाढते तसतसे शरीरातील पायांकडून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशाची अचूकता आणि त्यांचा वेग कमी होत जातात. तारुण्यात तसे नसते.*

▪️ *तसेच हाडांचे तारणहार समजले जाणारे शरीरातील कॅल्शियम काळाबरोबर कधीतरी नष्ट होते,  त्यामुळे म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये अस्थिभंग लवकर होतो.*

▪️ *अस्थिभंग (Bone fractures) वयस्क लोकांमध्ये अनेक गुंतागुंतीच्या मालिकेला कारण ठरू शकतो, विशेषतः मेंदूतील रक्तस्रावासारखे जीवघेणे आजार.* 

▪️ *पायांचे व्यायाम केंव्हाही सुरू करता येतात, अगदी साठीनंतरसुध्दा.*

▪️ *आपले पाय काळाबरोबर वृध्द होत असले तरी पायांचे व्यायाम हे आयुष्यभरासाठीचे कार्य असावे.*

▪️ *केवळ पायांची बळकटी वाढवणेदेखील वृध्दत्व थोपवू शकते.* 

▪️ *रोज किमान ३०/६० मिनिटे चाला, जेणेकरून पायांना पुरेसा व्यायाम  पायांचे स्नायू सशक्त राहतील.*

*आपल्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांना ही माहिती अवश्य पाठवा.*

Thursday, 18 March 2021

एनिमिया किंवा रक्ताची कमतरता....

*एनिमिया किंवा रक्ताची कमतरता....*

एनिमिया किंवा रक्ताची कमतरता भारतामध्ये आजकाल सामान्य समस्या आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे आपण फक्त अशक्तच होत नाही तर रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी अदिवासी बाहुल्य क्षेत्रात काही हर्बल उपयांचा वापर करतात. आज आपण जाणून घेऊया एनिमिया सारखी समस्या दूर करण्यासाठी काही हर्बल उपाय. जे अवलंबुन आज देखील जंगलात राहणारे अदिवासी या रोगाचे निदान करत आहेत.

सैवंध मीठ आणि लसनाचे सेवन केल्याने रक्त शुध्द होते. ज्या लोकांना रक्तातील प्लेटलेट्सची कमतरता आहे त्यांनी देखील मीठ आणि लसुनचे समान प्रमाणात सेवन केले पाहिजे. जेवणासोबतच लसुनच्या कच्च्या पाकळ्या आणि सैवंध मीठाचे सेवन खुप फायदेशीर मानले जाते.
पालकाचा रस दिवसातुन 3 वेळा अवश्य घेतला पाहिजे. पालकामध्ये व्हिटॅमिन ABC आणि E व्यतिरिक्त प्रोटीन, सोडियम, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन, थायमिन, फायबर, रायबोफ्लौविन आणि लोह तत्त्व असतात.
जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणत एकत्र करुन प्यायल्याने शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो आणि ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांचे रक्त वाढते.
ज्या लोकांना रक्ताच्या कमतरतेची समस्या आहे त्यांनी एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायला पाहिजे. असे केल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन रक्त वाढते. 
ज्या घरात टोमॅटोचा जास्त वापर होतो त्या घरात एनिमियाचे लक्षण दिसत नाही.
मक्याचे नरम हिरवे कनस भाजून खाल्ल्याने ते चविष्ट लागतात आणि पौष्टिक देखील असतात. मक्याचे दाने उकळून खाल्ल्याने स्वादूपिंड मजबूत होते. हे रक्त वाढवण्याचे काम देखील करते.
सिंघाडा शरीराला शक्ती देते आणि रक्त वाढवते. सिंघाड्यामध्ये प्रोटीन, चरबी, कार्बोहायड्रेट, फॉस्फोरस, लोह, खनिज तत्त्व, व्हिटॅमिन, स्टार्च आणि मॅग्नीज सारखे महत्त्वपूर्ण तत्त्व असतात. कच्च्या सिंघाड्याचे सेवन रक्ताचे प्रमाण वाढवण्यात मदत करते.
रक्ताची कमतरता असलेल्या रोग्यांनी जर अनंतमूल, दालचीनी आणि बडी सोप समान प्रमाणात घेऊन चहा सोबत उकळून कमीत कमी तीन दिवसात एकदा प्यायल्याने रक्त स्वच्छ होते. यासोबतच रक्त निर्माण होण्याच्या प्रक्रियेत मदत मिळते.

लाजाळू

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
*ओळख ओषधी वनस्पती*
*लाजाळू.....*
=========

लाजाळूच्या झाडाला कोणी स्पर्श केला तर त्याची पाने पाने मिटतात. आपल्या या गुणधर्मामुळे या वनस्पतीला मराठीत लाजरी, संकोचनी; हिंदीमध्ये लाजवती, लज्जावंती; गुजरातीमध्ये लजमणी, रिशामणी; संस्कृतमध्ये लज्‍जिका, लज्‍जालु असे म्हणतात. संपूर्ण भारतामध्ये आढळून येणारी ही वनस्पती औषधी गुणांनी भरलेली आहे. अनेक आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. आज तुम्हाला या वनस्पतीशी संबंधित सर्व आदिवासी उपायांची माहिती देत आहोत...

1. लाजाळूच्या मुळाचे आणि बियांचे चूर्ण दुधातून घेल्यास पुरुषांमधील वीर्याच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. पाताळकोट येथील आदिवासी अशा रुग्णांना लाजाळूच्या बियांचे 4 ग्रॅम चूर्ण दररोज रात्री एक ग्लासभर दुधातून घेण्याचा सल्ला देतात. एक महिनाभर हा उपाय केल्यास सकारत्मक बदल दिसून येतील.

2.लाजाळूचे 100 ग्रॅम पाने 300 मिली पाण्यामध्ये उकळून हा काढा डायबिटीजच्या रुग्णाला दिल्यास आराम मिळेल.

3. लाजाळूच्या बियांचे चूर्ण (3 ग्रॅम) दुधासोबत मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते.

4. लाजाळूच्या झाडाला आदिवासी बहुगुणी औषध मानतात. यांच्यानुसार हे रोपटे जखम लवकर भरून काढण्यात सक्षम आहे. या रोपाच्या मुळाचे 2 ग्रॅम चूर्ण दिवसातून तीन वेळेस कोमट पाण्यातून घेतल्यास अंतर्गत जखम लवकर ठीक होऊ शकते.

5. आधुनिक वैज्ञानिक शोधानुसार हाडांचे तुटणे आणि मांसपेशीमधील अंतर्गत जखमेच्या उपचारामध्ये लाजाळू रोपाचे मूळ महत्त्वाची भूमिका बजावते. जखम ठीक करण्यात या रोपाचे मूळ सक्रियतेने कार्य करते.

6. लाजाळूचे पाने पाण्यामध्ये बारीक करून हे मिश्रण नाभीच्या खाली लावल्यास लाघवी जास्त होणे बंद होते. या पानांचा 4 चमचे रस दिवसातून एकवेळेस घेतल्यास लाभ होतो.

7.  लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधामध्ये मिसळून घेतल्यास मुळव्याध आणि भगंदर रोग ठीक होतात. काही आदिवासी लाजाळूच्या पानांचा रस मुळव्याधीच्या जखमेवर लावण्याचा सल्ला देतात. यांच्या मते हा रस जखम कोरडी करण्यास मदत करतो.

8.  लाजाळूच्या पानांची एक चमचा पावडर लोण्यामध्ये मिसळून भगंदर किंवा मुळव्याधीच्या जखमेवर दिवसातून तीन वेळेस लावण्याचा सल्ला देतात.

Tuesday, 16 March 2021

दमा

 दम्याची सुरुवात लहानपणी होते. पुन्हा पुन्हा श्वास अडकणे किंवा सतत दम लागणे अशा प्रकारच्या लक्षणातून प्रकटणार्‍या या रोगाच्या त्रासाची वारंवारता व तीव्रता व्यक्तीवर अवलंबून असते. श्वसनमार्गाचा दाह झाल्यामुळे श्वसनमार्गातील चेतातंतूचे अधिक ज्वलन होते. म्हणून या प्रकारच्या दमाच्या त्रासादरम्यान श्वसनमार्गाच्या आतील त्वचा सुजल्यामुळे फुप्फुसात जाणार्‍या हवेचा प्रवाह कमी होतो.
अस्थमा हा श्‍वसन संस्थेचा एक विकार असून यामध्ये रुग्णास दम्याचे वेग येत असतात. श्वासोच्छवासाच्या मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो. अलोप्याथी उपचाराद्वारे दमा हा पूर्णपणे बरा करता येत नाही मात्र दम्याची लक्षणे उद्भवू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणे शक्‍य आहे. 
अस्थमा या आजारात वायुमार्ग हे संकीर्ण आणि सुजयुक्‍त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. त्यामुळे श्‍वासोच्छवास क्रियेत अडथळा निर्माण होतो. घशात कफ साठल्याने खोकल्याची उबळ येते. ती अतिशय तीव्रतेने येते परंतु कफामुळे व्यक्‍ती खोकून खोकून बेजार होतो. अस्थमा हा काही महाभयंकर असा आजार नव्हे. मात्र याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यास लागणाऱ्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्‌भवेल याचाही नेम नसतो.

अस्थमा हा काही महाभयंकर असा आजार नव्हे. श्वासोच्छवासाच्या मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो. या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यास लागणाऱ्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्‌भवेल याचाही नेम नसतो.
या अस्थमा म्हणजेच दम्याच्या आजाराचा उगम असतो तो आपल्या फुप्फुसांमध्ये.

दमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील (अतिसूक्ष्म धुलीकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदुषणांशी येणारा घनिष्ट संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी.

आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थांची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्नपदार्थाने दम्याचा त्रास होतो हे ओळखता येईल. मुलांना होणार्‍या ऍलर्जिक दम्याचे परिक्षण केलेले नसल्यास ते त्वरित करणेही आवश्यक आहे.

तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे.

इतर त्रासदायक घटक म्हणजे काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मसमयी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो.

वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.

फुप्फुसे –
माणसाची दोन फुफ्फुसे असून हृदयापुरती जागा सोडून छातीची संपूर्ण पोकळी ते व्यापून टाकतात. प्रत्येक फुप्फुसावर एक दुपदरी पिशवीचे आवरण असून त्यास फुप्फुसावरण किंवा प्ल्युराट असे म्हणतात. त्यापैकी बाह्यपदर हा छातीच्या अंतर्भागाला चिकटून असतो व त्याच्याशी संलग्न असलेला फुप्फुसाचा रंग भुरा-करडा असून प्रत्येक फुप्फुसाचे जे लहान भाग होतात त्याचेही पुढे आणखी लहान लहान उपविभाग होऊन प्रत्येकात एकेक वायुवाहिनी शिरलेली असते. या प्रत्येक सूक्ष्म वायू वाहिनीच्या शेवटी गोल आकाराच्या व अत्यंत पातळ अथवा झिरझिरीत आवरणाने बनलेल्या वायुच्या पिशव्या असून त्यांना वायुकोश असे म्हणतात. वायुकोशाच्या भोवती सूक्ष्म केशवाहिन्यांचे जाळे असते व त्यांच्या भिंतींही अशाच झिरझिरीत असल्याने कोशातील प्राणवायु केशवाहिन्यांतील रक्तात सहज शोषला जातो. हा शोषुन विरलेला प्राणवायू मग तांबड्या पेशींतील रंजक द्रव्याद्वारे हिमोग्लोबीन शरीरातील विविध भागांना पुरविला जातो. तसेच, सूक्ष्म केशवाहिन्यांतील कार्बनडाय-ऑक्‍साईड वायु व पाण्याची वाफ हे वायुकोशात शोषले जाऊन, उच्छ्वासावाटे शरीराबाहेर टाकले जातात. प्राणवायु आत घेणे व कर्बधिप्रणित वायु आणि इतर दूषित द्रव्ये बाहेर टाकणे या संयुक्त क्रियेला प्राणवायुप्रदान ऑक्‍सिजनेशन अशी परिभाषिक संज्ञा असून ही क्रिया श्वासोच्छवासामुळे घडते.

श्वासपटल हा एक घुमटाकार स्नायुमय विभाजक पडदा असून, तो छाती व उदर यांच्या मधे असतो. तो संकोच पावला की, सपाट होऊन छातीचे आकारमान मोठे होते. अशा प्रकारे विस्तार होवून जास्त झालेली मोकळी जागा भरून काढण्यासाठी लवचिक फुप्फुसे विस्तारतात आणि मग फुप्फुसांमध्ये जास्त झालेली पोकळी भरून काढण्यासाठी नाकावाटे हवा फुप्फुसात शिरते. या क्रियेला श्वास असे म्हणतात. याच्या उलट जेव्हा श्वासपटल प्रसरण पावते तेव्हा छातीची पोकळी कमी होऊन फुप्फुसातील हवा बाहेर ढकलली जाते. यास उच्छ्वास असे म्हणतात. या दोन्ही क्रिया मिळून श्वासोच्छ्वासाची क्रिया होते. दर मिनिटाला सुमारे ते वेळा श्वासोच्छ्वास होतो. मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो.

या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाऐकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एका एकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यास लागणाऱ्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्‌भवेल याचाही नेम नसतो.

*काही बाधक घटक –* 
ऍलर्जी (तीव्र संवेदनक्षमता)
दम्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ऍलर्जी म्हणजेच तीव्र संवेदनक्षमता होय. विशिष्ट खाद्यपदार्थ, रजकण, पुष्पकेशर, औषधी द्रव्ये यांसारखे काही पदार्थ विशिष्ट व्यक्तींना त्रासदायक ठरतात. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट पदार्थलाच इतर कोणत्याही द्रवाला नव्हे तीव्र संवेदनात्मक प्रतिक्रिया दर्शविते. एखाद्याला अंड्यातील प्रोटीनची ऍलर्जी असते. अशा माणसाने अंड्यापासून केलेला कोणताही पदार्थ खाल्ला, एवढेच नव्हे तर तो पदार्थ ज्या बशीतून दुसऱ्याने खाल्ला असेल त्याच बशीचा उपयोग दुसरा पदार्थ खाण्यासाठी केला तरी एवढ्याने देखील त्याला उलट्या, अंगावर गाठी इ. ऍलर्जीची लक्षणे सुरू होतात असा अनुभव आहे. एखाद्याला ऑस्पिरिनच्या एका गोळीनेही ऍलर्जीची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया समजण्यासाठी अँटिजेन (प्रतिद्रव्य जनक) म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल.

*अँटीजेन –*
जो पदार्थ शरीरात शिरल्यावर अँटिबॉडीज्‌ निर्माण करतो त्याला अँटिजेन म्हणतात. नंतर पुन्हा जेव्हा या वर्गातील द्रव्य तोंडाने, नाकाने स्पर्श होऊनही किंवा इंजक्‍शनद्वारे शरीरात जाते तेव्हा पूर्वी उत्पन्न झालेल्या अँटिबॉडीज्‌ व हे नविन ऍटिजेन यामध्ये प्रक्रिया होऊन त्यामुळे विशिष्ट बाधक रसायने निर्माण होतात. त्यामुळे मळमळ होणे, गाठी उठणे इ. लक्षणे दिसून येतात.

*अँटिबॉडी –*
अँटिजेन पदार्थ शरीरात गेला की त्यामुळेच अँटीबॉडी निर्माण होतात. अँटीजेन व अँटीबॉडी ह्यांचा संयोग नाक, फुप्फुस, त्वचा अशा विशिष्ट भागी झाला की सर्दी होणे, धाप लागणे (दमा सुरू होणे) यासारखी लक्षणे सुरू होतात. पण ते एकदम लक्षात येत नाही व म्हणूनच आपल्याला नेमका कशाचा त्रास होतो, म्हणजेच कशाची ऍलर्जी आहे, याचे परिक्षण करणे आवश्‍यक असते. ऍलर्जीचा थोडासा संशय येताच डॉक्‍टरी सल्ला लगेच घ्यावा.

*एलर्जीच्या कारणाचे निदान –*
ऍलर्जी मागील कार्यकारण भाव निश्‍चित करण्यासाठी, त्या व्यक्तींची त्या दिवसाची दिनचर्या म्हणजेच ऍलर्जी उद्‌भवण्यापूर्वी काय काय गोष्टी क्रमश: घडत गेल्या याची संगतवार माहिती, औषधे, अन्न इत्या. चा तपशील, घरचे वातावरण व नोकरी व्यवसायाची जागा इत्यादी बारीक सारीक माहितीचा तपशील घेणे जरूर आहे. वरील तपशीलवार माहितीशिवाय ऍटिजेनचे स्वरूप ठरविण्यासाठी पुढील परिक्षणे करावी लागतात. त्यासाठी निरनिराळी ऍटीजेन तयार मिळतात.

आराखडे काढून परिक्षण: हि एक साधी परीक्षणाची रीत असून लहान मुलांसाठी सोयीची आहे. यात चामडीवर ऍटीजेन चा एक थेंब टाकून उभे ओरखडे रक्त येऊ नये इतपत हळूवार हाताने काढतात. सुमारे अर्ध्या तासात कमी – जास्त प्रतिक्रिया होते. यात चामडीवर ऍटीजेन चा एक थेंब टाकून उभे ओरखडे रक्त येऊ नये इतपत हळूवार हाताने काढतात. सुमारे अर्ध्या तासात कमी-जास्त प्रतिक्रिया होते. त्या जागी त्यात फुगवटा आल्यास त्या ऍटीजेनने ऍलर्जी येते. ही ऍलर्जी मिली मिटरमध्ये स्केल द्वारे किंवा कॉलीपर द्वारे मोजतात व तसेच निगेटीव्ह कंट्रोल हे बफर सलाईनच्या थेंबाने बघतात व पॉजेटीव्ह कंट्रोल हे हिस्टामीन नावाच्या पदार्थाच्या थेंबाने बघतात व नंतर हायपोसेनसि टायझेशनच्या औषध उपचाराकरिता रिपोर्ट पाठवतात. हायपोसेंसिटाझेशन म्हणजे संवेदना मंदीकरण
ऍलर्जी उत्पन्न करणारे ऍटिजेन सापडलेच तर मग त्याची प्रथम लहान लहान व पुढे क्रमश: वाढत्या प्रमाणात इंजेक्‍शन हप्त्यातून दोन वेळा देऊन ऍलर्जी उत्पन्न होण्याची प्रवृत्ती थांबविता येते. पुढे एका वर्षानंतर महिन्यातून एक वेळ किंवा दोन वेळ मेंटेनन्स डोस द्यावा लागतो. शरीराला त्या द्रव्याची जणू हळूहळू सवय होऊन त्यातील बाधकता नाहीशी होते. या प्रक्रियेला संवेदना मंदीकरण हायपोसेंसिटायझेशन असे म्हणतात.

ऋतुकालदी परिस्थिती: काहींना दमा रूक्ष व थंड हवेने सुरू होतो. आपल्याला काय मानवते व काय बाधते ते त्या व्यक्तीने अनुभवाने ठरवून बाधक तेवढे टाळावे.

शारीरिक उणिवा दूर करणे: नाकातील हाड वाढणे व पडदा सरळ नसणे, त्यावर छोटीशी गाठ येणे इ. दोष आढळल्यास ते दुरूस्त करावे.

संसर्गदोष दूर करणे: नाक, घसा सारख्या श्वसन मार्गातील वरच्या भागात संसर्गबाधा असल्यास अशा व्यक्तींनी थंडी, वारा ओला पाऊस यांस जपावे व पडसे खोकला बंदोबस्त करावा.

पचनाच्या तक्रारीही: दम्याला आमंत्रण देतात मलावरोध, अपचन, अर्जीर्ण यांची उपेक्षा करू नये. तसेच, खाण्यापिण्यातील अत्याचार व एकदा बाधक ठरलेले विशिष्ट पदार्थ टाळणेच भाग आहे.

*मानसिक कारणे:* चिडखोरपणा, अती चिंता, मनाचा समतोल बिघडणे यामुळे दम्याचा इतर कारणास हातभार लागून दमं सुरू होतो. यावर प्राणायम, योगनिद्रा, मेडिटरेशनने फायदा होतो.
क्‍सरसाईज टॉंलरंस टेस्ट (चाचणी)
प्राणायाम, योगासने ही जरी दम्याच्या रूग्णासाठी लाभकारक असली तरी प्रत्येकच दम्याच्या रूग्णांना ती सारख्याच प्रमाणात योग्य ठरणार नाहीत. कारण प्रत्येकाची क्षमता ही वेगळी वेगळी असेल म्हणुनच रूग्णाने यापैकी काय करावे व काय करू नये यासाठी एक चाचणी येथे दिलेली आहे. या चाचणीलाच एक्‍सरसाईज टॉलरंस टेस्ट म्हणतात. ही चाचणी स्वत:चीच स्वताला घेता येते.

*कशी असावी अस्थमा रुग्णाची दिनचर्या?*
रोज सकाळी जलधौती (वमन) व जलनेतीचा नियमित अभ्यास करावा. तसेच आपल्या तोंडाची व शरीराची स्वच्छत: पाळावी.

– मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या.
– प्राणायम, लंग व्हायटलायझरच्या साह्याने श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करावा.
– योगासने करावी.
– सकाळ सायंकाळ डॉक्‍टरानी दिलेली औषधे नियमित घ्यावी.
– रात्री झोपताना गरम पाण्यात ते मिनिटे पाय बुडवून बसावे.

*काय काळजी घ्यावी.. ?*
1. रोज मीठ घालून गरम पाण्याने गुळण्या कराव्या.
2. गरम पाण्याचा वाफारा घ्यावा.
3. नाकाची स्वच्छत: राखावी. (नेती क्रिया करावी)
4. तोंड स्वच्छ ठेवावे. प्रत्येक जेवणानंतर दात घासावे व जीभ (बाजारात मिळणाऱ्या प्लॅस्टीकच्या दांडीने स्वच्छ ठेवावी.)
5. धूम्रपान करू नये.
6. उग्रदर्प असलेल्या वस्तुपासून दूर रहावे. (उदा. रसायने, रंग इ.)
7. अधिक धावू नये, त्याऐवजी हळूहळू चालावे.
8. ऍस्पिरिनयुक्त औषधे पोटात घेऊ नये.
9. दारू, थंडपेय, तळीव पदार्थ, आंबट पदार्थाचे सेवन कधीच करू नये.
10. दिवसातून अधिकाधिक पाणी प्यावे.
11. रात्रीचे जेवण मात्र सुपाच्या (हलके) व सूर्यास्तापूर्वी करावे.
12. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. रोज स्वच्छ अंथरूण पांघरूण वापरावे.
13. रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवावे.
दम्याच्या रूग्णांनी धूळ, प्राण्याचे कातडे, उनी कपडे यापासून दूर रहावे. अधिक महत्वाचे म्हणजे आपल्याला दमा आहे कसे होईल? अशी काळजी करू नये. दम्याच्या रूग्णांनी व्यायामाच्या अगोदर इनहेलर असो की एरोकॉर्ट, अस्थालीन किंवा बिक्रॅंनिल इनहेलरचा वापर करावा. आणि नंतरच व्यायाम करावा. दम्याचा त्रास मध्यरात्री होत असल्यास थिओलांग मि. ग्राम. ची एक कॅपसूल द्यावा.

या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एका एकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायु एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यात लागणाऱ्या सर्व स्नायुंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही देवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच तो परत कसा उद्‌भवेल याचाही नेम नसतो.

*दम्याची धाप चालू असता घ्यावयाची काळजी –*
– दम्याच्या रूग्णाला बसल्या अवस्थेत व थोडे समोर झुकून स्टूल किंवा कोणत्याही आधाराने बसावावे. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास मदत होते.
– कुठलेही श्रम करू नये, पूर्ण आराम करावा. त्यामुळे प्राणवायुची गरज कमी होते व धाप कमी होवू शकते.
– गंभीर अवस्थेत रूग्णाला प्राणवायु (ऑक्‍सीजन) लावावा लागतो. प्राणवायूचे प्रमाण ते लिटर प्रत्येक मिनिटाला ह्या प्रमाणे घ्यावा लागतो.
– आकुंचन पावलेल्या श्वास नलिकेला परत प्रसारित करण्याकरिता विविध औषधोपचार उपलब्ध आहेत. सद्यास्थितीतील प्रचलित असलेली श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होऊ लागला की, श्वासोच्छ्वासाचा मार्ग मोकळा करण्याची तातडीची गरज असते. अशा वेळी औषध घेण्याकरिता नेब्युलायझरचा उपयोग केला जातो व औषध थेट श्वासनलिकेत सोडले जाते. हे औषध द्रव रूपात असते. ह्या औषधात प्राणवायू सोडला जातो व द्रवाचे रूपांतर धुक्‍याप्रमाणे वाफेत केले जाते. ज्यावेळी दम्याचा जोर अधिक असतो त्यावेळी रूग्णाला साध्या इनहेलरच्या साह्याने औषध घेणे कठीण जाते. अशावेळी नेब्युलायझरचा उपयोग केला जातो. तसेच लहान मुलांसाठीही याचा उपयोग करणे सोयीचे असते.

आपली भारतीय संस्कृती

*1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?*
*(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)*
*कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.*
*त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.*
*या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.*

*काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.*
*त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.*
*इथे कारण उलटे असते*
*कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.*

*4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?*
*आलं का logic लक्षात.*

*5) शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे,*
*पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही.*

*6) हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?*
*आता western लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा.*

*7) घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?*
*Logic लक्षात घ्या.*

*8. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....?*
*उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो.*
*या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...?*

*9)*
*आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.*

*10*
*जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे.*
*असे का...?*
*इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही...!*
*आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे.*
*आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.*

*11*
*एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही?*
*कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप,रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. Nonveg खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.*

*12*
*उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे..?*
 भारतीय पद्धतींचा logical विचार करा.*
*त्या बरोबर आहेत .👍*

*_आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे._*

🙏 *घरातच रहा सुरक्षित रहा*🙏

Friday, 12 March 2021

जुने दिवस

*मोट गेली, नाडा गेला,*
*गेला सोंदुर कणा* 
*सहा बैल नांगर आता,*
*दिसेल का हो पुन्हा*
*हेल गेला, कासरा गेला,*
*गेली शर्यत बैल गाडीची.*
*मोगरी गेली, हातणी गेली,*
*गेली मळणी धान्याची.*  
*वावडी गेली,उपननी गेली,*                 
*गेली धार धान्याची.*
*भुसारा गेला,कलवड गेला,*
*गेली इर्जिक नांगराची*         
*वाडगं गेलं,खळं गेलं,*
*गेली शान झोपाट्याची.* 
*सावड गेली,बलुतं गेलं,*
*गेली राखुळी गुरांची.*
*हौद गेला, सारन गेली,*
*गेली बारव जुनी* 
*वढवान गेलं, रहाट गेलं* 
*शेंदु कसं पाणी* 

*मेड गेली, कुड गेला* 
*गेला वसा आढं* 
*कुळव गेला, डुब्बं गेल* 
*फराड गेलं पुढं*

*खुरवत गेला, खळं गेलं*
*चंद्राचं ते तळं गेलं*  

*हरनाची गाडी गेली* 
*मामाची पण माडी गेली* 
*हेल गेला, गंजं गेली*
 
*करडईचा फड गेला* 
*अंगणात लावलेला भला मोठा* *वड गेला*

*बोरं गेली, जांभळं गेली* 
*गेला रानमेवा* 
*खंबीर होती जूनी पिढी* 
*गावाकडे तेव्हा*
 
*आता कुठ शोधायच्या* 
*गावाकडच्या वाटा* 
*प्रगतीच्या नावाखाली* 
*मोजू कसा तोटा* 

*सांग मिञा, कधी आता* 
*गावाकडे जायचं* 
*ताटलीत दुध भाकर* 
*चुरून मुरून खायचं* 
*यातले कितीतरी शब्द* *आपल्याला भविष्यात* *आठवणार नाहीत..*

Tuesday, 9 March 2021

आरोग्य मंत्र

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही.

२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.

३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.

४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.

५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.

६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.

७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.

८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे – हाडे मजबूत होतात.

९) ऐकू न येणे- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे

१0) शरीरशुद्धी साठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे – हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.

११) जुलाबासाठी- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.

१२) नाकाचे हाड वाढणे- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.

१३) मुळव्याधासाठी- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ – ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.

१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.

15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.

१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते.

१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.

१८) पोटाच्या आजारावर – वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.

१९) कानाच्या पडद्याला भोक – उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.

२०) हात पायाला घाम येणे – सुपारीचे एक खांड – सकाळी व संध्याकाळी खाणे – १५ दिवस खाणे.

२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे – त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.

२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा – असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.

माका अर्थात भृंगराज

माका अर्थात भृंगराज आयुर्वेदात याचा आवाज रानावनात शेतात बांधावर माका अर्थात भृंगराज मीळतो. यात ईतके रसायने आहेत की गाईचे दुध व माकारस तुम्...