दम्याची सुरुवात लहानपणी होते. पुन्हा पुन्हा श्वास अडकणे किंवा सतत दम लागणे अशा प्रकारच्या लक्षणातून प्रकटणार्या या रोगाच्या त्रासाची वारंवारता व तीव्रता व्यक्तीवर अवलंबून असते. श्वसनमार्गाचा दाह झाल्यामुळे श्वसनमार्गातील चेतातंतूचे अधिक ज्वलन होते. म्हणून या प्रकारच्या दमाच्या त्रासादरम्यान श्वसनमार्गाच्या आतील त्वचा सुजल्यामुळे फुप्फुसात जाणार्या हवेचा प्रवाह कमी होतो.
अस्थमा हा श्वसन संस्थेचा एक विकार असून यामध्ये रुग्णास दम्याचे वेग येत असतात. श्वासोच्छवासाच्या मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो. अलोप्याथी उपचाराद्वारे दमा हा पूर्णपणे बरा करता येत नाही मात्र दम्याची लक्षणे उद्भवू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणे शक्य आहे.
अस्थमा या आजारात वायुमार्ग हे संकीर्ण आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची निर्मिती होते. त्यामुळे श्वासोच्छवास क्रियेत अडथळा निर्माण होतो. घशात कफ साठल्याने खोकल्याची उबळ येते. ती अतिशय तीव्रतेने येते परंतु कफामुळे व्यक्ती खोकून खोकून बेजार होतो. अस्थमा हा काही महाभयंकर असा आजार नव्हे. मात्र याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यास लागणाऱ्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.
अस्थमा हा काही महाभयंकर असा आजार नव्हे. श्वासोच्छवासाच्या मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो. या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यास लागणाऱ्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.
या अस्थमा म्हणजेच दम्याच्या आजाराचा उगम असतो तो आपल्या फुप्फुसांमध्ये.
दमा होण्याची प्रमुख कारणे म्हणजे बालवयामध्ये घरामधील (अतिसूक्ष्म धुलीकणांनी तसेच झुरळ, उंदीर, मांजर, फर्निचर इ.) प्रदुषणांशी येणारा घनिष्ट संबंध, अनुवांशिक दम्याचा त्रास तसेच अंडी, शेंगदाणे व दुग्धजन्य पदार्थांची लहान मुलांना होणारी ऍलर्जी.
आपण लहान मुलांना द्यावयाच्या अन्नपदार्थांची दैनंदिन नोंद केल्यास कुठल्या अन्नपदार्थाने दम्याचा त्रास होतो हे ओळखता येईल. मुलांना होणार्या ऍलर्जिक दम्याचे परिक्षण केलेले नसल्यास ते त्वरित करणेही आवश्यक आहे.
तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व त्याचा धूर तसेच रासायनिक पदार्थांशी आपापल्या कामाच्या ठिकाणी येणारा संपर्क हा अतिरिक्त अपायकारक घटक आहे.
इतर त्रासदायक घटक म्हणजे काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मसमयी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो.
वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.
फुप्फुसे –
माणसाची दोन फुफ्फुसे असून हृदयापुरती जागा सोडून छातीची संपूर्ण पोकळी ते व्यापून टाकतात. प्रत्येक फुप्फुसावर एक दुपदरी पिशवीचे आवरण असून त्यास फुप्फुसावरण किंवा प्ल्युराट असे म्हणतात. त्यापैकी बाह्यपदर हा छातीच्या अंतर्भागाला चिकटून असतो व त्याच्याशी संलग्न असलेला फुप्फुसाचा रंग भुरा-करडा असून प्रत्येक फुप्फुसाचे जे लहान भाग होतात त्याचेही पुढे आणखी लहान लहान उपविभाग होऊन प्रत्येकात एकेक वायुवाहिनी शिरलेली असते. या प्रत्येक सूक्ष्म वायू वाहिनीच्या शेवटी गोल आकाराच्या व अत्यंत पातळ अथवा झिरझिरीत आवरणाने बनलेल्या वायुच्या पिशव्या असून त्यांना वायुकोश असे म्हणतात. वायुकोशाच्या भोवती सूक्ष्म केशवाहिन्यांचे जाळे असते व त्यांच्या भिंतींही अशाच झिरझिरीत असल्याने कोशातील प्राणवायु केशवाहिन्यांतील रक्तात सहज शोषला जातो. हा शोषुन विरलेला प्राणवायू मग तांबड्या पेशींतील रंजक द्रव्याद्वारे हिमोग्लोबीन शरीरातील विविध भागांना पुरविला जातो. तसेच, सूक्ष्म केशवाहिन्यांतील कार्बनडाय-ऑक्साईड वायु व पाण्याची वाफ हे वायुकोशात शोषले जाऊन, उच्छ्वासावाटे शरीराबाहेर टाकले जातात. प्राणवायु आत घेणे व कर्बधिप्रणित वायु आणि इतर दूषित द्रव्ये बाहेर टाकणे या संयुक्त क्रियेला प्राणवायुप्रदान ऑक्सिजनेशन अशी परिभाषिक संज्ञा असून ही क्रिया श्वासोच्छवासामुळे घडते.
श्वासपटल हा एक घुमटाकार स्नायुमय विभाजक पडदा असून, तो छाती व उदर यांच्या मधे असतो. तो संकोच पावला की, सपाट होऊन छातीचे आकारमान मोठे होते. अशा प्रकारे विस्तार होवून जास्त झालेली मोकळी जागा भरून काढण्यासाठी लवचिक फुप्फुसे विस्तारतात आणि मग फुप्फुसांमध्ये जास्त झालेली पोकळी भरून काढण्यासाठी नाकावाटे हवा फुप्फुसात शिरते. या क्रियेला श्वास असे म्हणतात. याच्या उलट जेव्हा श्वासपटल प्रसरण पावते तेव्हा छातीची पोकळी कमी होऊन फुप्फुसातील हवा बाहेर ढकलली जाते. यास उच्छ्वास असे म्हणतात. या दोन्ही क्रिया मिळून श्वासोच्छ्वासाची क्रिया होते. दर मिनिटाला सुमारे ते वेळा श्वासोच्छ्वास होतो. मार्गात काही तरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजेच दमा उसळणे होय. दमा उसळला की, रूग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छवास चालतो.
या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाऐकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एका एकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायू एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यास लागणाऱ्या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच, तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.
*काही बाधक घटक –*
ऍलर्जी (तीव्र संवेदनक्षमता)
दम्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ऍलर्जी म्हणजेच तीव्र संवेदनक्षमता होय. विशिष्ट खाद्यपदार्थ, रजकण, पुष्पकेशर, औषधी द्रव्ये यांसारखे काही पदार्थ विशिष्ट व्यक्तींना त्रासदायक ठरतात. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट पदार्थलाच इतर कोणत्याही द्रवाला नव्हे तीव्र संवेदनात्मक प्रतिक्रिया दर्शविते. एखाद्याला अंड्यातील प्रोटीनची ऍलर्जी असते. अशा माणसाने अंड्यापासून केलेला कोणताही पदार्थ खाल्ला, एवढेच नव्हे तर तो पदार्थ ज्या बशीतून दुसऱ्याने खाल्ला असेल त्याच बशीचा उपयोग दुसरा पदार्थ खाण्यासाठी केला तरी एवढ्याने देखील त्याला उलट्या, अंगावर गाठी इ. ऍलर्जीची लक्षणे सुरू होतात असा अनुभव आहे. एखाद्याला ऑस्पिरिनच्या एका गोळीनेही ऍलर्जीची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया समजण्यासाठी अँटिजेन (प्रतिद्रव्य जनक) म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल.
*अँटीजेन –*
जो पदार्थ शरीरात शिरल्यावर अँटिबॉडीज् निर्माण करतो त्याला अँटिजेन म्हणतात. नंतर पुन्हा जेव्हा या वर्गातील द्रव्य तोंडाने, नाकाने स्पर्श होऊनही किंवा इंजक्शनद्वारे शरीरात जाते तेव्हा पूर्वी उत्पन्न झालेल्या अँटिबॉडीज् व हे नविन ऍटिजेन यामध्ये प्रक्रिया होऊन त्यामुळे विशिष्ट बाधक रसायने निर्माण होतात. त्यामुळे मळमळ होणे, गाठी उठणे इ. लक्षणे दिसून येतात.
*अँटिबॉडी –*
अँटिजेन पदार्थ शरीरात गेला की त्यामुळेच अँटीबॉडी निर्माण होतात. अँटीजेन व अँटीबॉडी ह्यांचा संयोग नाक, फुप्फुस, त्वचा अशा विशिष्ट भागी झाला की सर्दी होणे, धाप लागणे (दमा सुरू होणे) यासारखी लक्षणे सुरू होतात. पण ते एकदम लक्षात येत नाही व म्हणूनच आपल्याला नेमका कशाचा त्रास होतो, म्हणजेच कशाची ऍलर्जी आहे, याचे परिक्षण करणे आवश्यक असते. ऍलर्जीचा थोडासा संशय येताच डॉक्टरी सल्ला लगेच घ्यावा.
*एलर्जीच्या कारणाचे निदान –*
ऍलर्जी मागील कार्यकारण भाव निश्चित करण्यासाठी, त्या व्यक्तींची त्या दिवसाची दिनचर्या म्हणजेच ऍलर्जी उद्भवण्यापूर्वी काय काय गोष्टी क्रमश: घडत गेल्या याची संगतवार माहिती, औषधे, अन्न इत्या. चा तपशील, घरचे वातावरण व नोकरी व्यवसायाची जागा इत्यादी बारीक सारीक माहितीचा तपशील घेणे जरूर आहे. वरील तपशीलवार माहितीशिवाय ऍटिजेनचे स्वरूप ठरविण्यासाठी पुढील परिक्षणे करावी लागतात. त्यासाठी निरनिराळी ऍटीजेन तयार मिळतात.
आराखडे काढून परिक्षण: हि एक साधी परीक्षणाची रीत असून लहान मुलांसाठी सोयीची आहे. यात चामडीवर ऍटीजेन चा एक थेंब टाकून उभे ओरखडे रक्त येऊ नये इतपत हळूवार हाताने काढतात. सुमारे अर्ध्या तासात कमी – जास्त प्रतिक्रिया होते. यात चामडीवर ऍटीजेन चा एक थेंब टाकून उभे ओरखडे रक्त येऊ नये इतपत हळूवार हाताने काढतात. सुमारे अर्ध्या तासात कमी-जास्त प्रतिक्रिया होते. त्या जागी त्यात फुगवटा आल्यास त्या ऍटीजेनने ऍलर्जी येते. ही ऍलर्जी मिली मिटरमध्ये स्केल द्वारे किंवा कॉलीपर द्वारे मोजतात व तसेच निगेटीव्ह कंट्रोल हे बफर सलाईनच्या थेंबाने बघतात व पॉजेटीव्ह कंट्रोल हे हिस्टामीन नावाच्या पदार्थाच्या थेंबाने बघतात व नंतर हायपोसेनसि टायझेशनच्या औषध उपचाराकरिता रिपोर्ट पाठवतात. हायपोसेंसिटाझेशन म्हणजे संवेदना मंदीकरण
ऍलर्जी उत्पन्न करणारे ऍटिजेन सापडलेच तर मग त्याची प्रथम लहान लहान व पुढे क्रमश: वाढत्या प्रमाणात इंजेक्शन हप्त्यातून दोन वेळा देऊन ऍलर्जी उत्पन्न होण्याची प्रवृत्ती थांबविता येते. पुढे एका वर्षानंतर महिन्यातून एक वेळ किंवा दोन वेळ मेंटेनन्स डोस द्यावा लागतो. शरीराला त्या द्रव्याची जणू हळूहळू सवय होऊन त्यातील बाधकता नाहीशी होते. या प्रक्रियेला संवेदना मंदीकरण हायपोसेंसिटायझेशन असे म्हणतात.
ऋतुकालदी परिस्थिती: काहींना दमा रूक्ष व थंड हवेने सुरू होतो. आपल्याला काय मानवते व काय बाधते ते त्या व्यक्तीने अनुभवाने ठरवून बाधक तेवढे टाळावे.
शारीरिक उणिवा दूर करणे: नाकातील हाड वाढणे व पडदा सरळ नसणे, त्यावर छोटीशी गाठ येणे इ. दोष आढळल्यास ते दुरूस्त करावे.
संसर्गदोष दूर करणे: नाक, घसा सारख्या श्वसन मार्गातील वरच्या भागात संसर्गबाधा असल्यास अशा व्यक्तींनी थंडी, वारा ओला पाऊस यांस जपावे व पडसे खोकला बंदोबस्त करावा.
पचनाच्या तक्रारीही: दम्याला आमंत्रण देतात मलावरोध, अपचन, अर्जीर्ण यांची उपेक्षा करू नये. तसेच, खाण्यापिण्यातील अत्याचार व एकदा बाधक ठरलेले विशिष्ट पदार्थ टाळणेच भाग आहे.
*मानसिक कारणे:* चिडखोरपणा, अती चिंता, मनाचा समतोल बिघडणे यामुळे दम्याचा इतर कारणास हातभार लागून दमं सुरू होतो. यावर प्राणायम, योगनिद्रा, मेडिटरेशनने फायदा होतो.
क्सरसाईज टॉंलरंस टेस्ट (चाचणी)
प्राणायाम, योगासने ही जरी दम्याच्या रूग्णासाठी लाभकारक असली तरी प्रत्येकच दम्याच्या रूग्णांना ती सारख्याच प्रमाणात योग्य ठरणार नाहीत. कारण प्रत्येकाची क्षमता ही वेगळी वेगळी असेल म्हणुनच रूग्णाने यापैकी काय करावे व काय करू नये यासाठी एक चाचणी येथे दिलेली आहे. या चाचणीलाच एक्सरसाईज टॉलरंस टेस्ट म्हणतात. ही चाचणी स्वत:चीच स्वताला घेता येते.
*कशी असावी अस्थमा रुग्णाची दिनचर्या?*
रोज सकाळी जलधौती (वमन) व जलनेतीचा नियमित अभ्यास करावा. तसेच आपल्या तोंडाची व शरीराची स्वच्छत: पाळावी.
– मीठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या.
– प्राणायम, लंग व्हायटलायझरच्या साह्याने श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करावा.
– योगासने करावी.
– सकाळ सायंकाळ डॉक्टरानी दिलेली औषधे नियमित घ्यावी.
– रात्री झोपताना गरम पाण्यात ते मिनिटे पाय बुडवून बसावे.
*काय काळजी घ्यावी.. ?*
1. रोज मीठ घालून गरम पाण्याने गुळण्या कराव्या.
2. गरम पाण्याचा वाफारा घ्यावा.
3. नाकाची स्वच्छत: राखावी. (नेती क्रिया करावी)
4. तोंड स्वच्छ ठेवावे. प्रत्येक जेवणानंतर दात घासावे व जीभ (बाजारात मिळणाऱ्या प्लॅस्टीकच्या दांडीने स्वच्छ ठेवावी.)
5. धूम्रपान करू नये.
6. उग्रदर्प असलेल्या वस्तुपासून दूर रहावे. (उदा. रसायने, रंग इ.)
7. अधिक धावू नये, त्याऐवजी हळूहळू चालावे.
8. ऍस्पिरिनयुक्त औषधे पोटात घेऊ नये.
9. दारू, थंडपेय, तळीव पदार्थ, आंबट पदार्थाचे सेवन कधीच करू नये.
10. दिवसातून अधिकाधिक पाणी प्यावे.
11. रात्रीचे जेवण मात्र सुपाच्या (हलके) व सूर्यास्तापूर्वी करावे.
12. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. रोज स्वच्छ अंथरूण पांघरूण वापरावे.
13. रोज आंघोळ करून शरीर स्वच्छ ठेवावे.
दम्याच्या रूग्णांनी धूळ, प्राण्याचे कातडे, उनी कपडे यापासून दूर रहावे. अधिक महत्वाचे म्हणजे आपल्याला दमा आहे कसे होईल? अशी काळजी करू नये. दम्याच्या रूग्णांनी व्यायामाच्या अगोदर इनहेलर असो की एरोकॉर्ट, अस्थालीन किंवा बिक्रॅंनिल इनहेलरचा वापर करावा. आणि नंतरच व्यायाम करावा. दम्याचा त्रास मध्यरात्री होत असल्यास थिओलांग मि. ग्राम. ची एक कॅपसूल द्यावा.
या जीर्ण श्वास विकारात अधून मधून धाप लागते. विशेषत: उच्छ्वासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटापूर्वी ब-या स्थितीत असलेल्या माणसाला एका एकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्यांचे स्नायु एकाएकी आंकुचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छ्वास करण्यात लागणाऱ्या सर्व स्नायुंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सूं सूं आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही देवसापर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.
*दम्याची धाप चालू असता घ्यावयाची काळजी –*
– दम्याच्या रूग्णाला बसल्या अवस्थेत व थोडे समोर झुकून स्टूल किंवा कोणत्याही आधाराने बसावावे. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास मदत होते.
– कुठलेही श्रम करू नये, पूर्ण आराम करावा. त्यामुळे प्राणवायुची गरज कमी होते व धाप कमी होवू शकते.
– गंभीर अवस्थेत रूग्णाला प्राणवायु (ऑक्सीजन) लावावा लागतो. प्राणवायूचे प्रमाण ते लिटर प्रत्येक मिनिटाला ह्या प्रमाणे घ्यावा लागतो.
– आकुंचन पावलेल्या श्वास नलिकेला परत प्रसारित करण्याकरिता विविध औषधोपचार उपलब्ध आहेत. सद्यास्थितीतील प्रचलित असलेली श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होऊ लागला की, श्वासोच्छ्वासाचा मार्ग मोकळा करण्याची तातडीची गरज असते. अशा वेळी औषध घेण्याकरिता नेब्युलायझरचा उपयोग केला जातो व औषध थेट श्वासनलिकेत सोडले जाते. हे औषध द्रव रूपात असते. ह्या औषधात प्राणवायू सोडला जातो व द्रवाचे रूपांतर धुक्याप्रमाणे वाफेत केले जाते. ज्यावेळी दम्याचा जोर अधिक असतो त्यावेळी रूग्णाला साध्या इनहेलरच्या साह्याने औषध घेणे कठीण जाते. अशावेळी नेब्युलायझरचा उपयोग केला जातो. तसेच लहान मुलांसाठीही याचा उपयोग करणे सोयीचे असते.
No comments:
Post a Comment