मित्रांनो एक प्रश्न प्रत्येक भारतीयांनी स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे की रुपयाचे अवमूल्यन का होत आहे ? रुपयाची किंमत कशी वाढवता येईल ?
ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस डॉलर ची आणि रुपयाची किंमत एकसमान होती मग आज या दोन्ही मध्ये एव्हडी तफावत का पाहावयास मिळत आहे? त्याचे कारण काय असावे असे आपल्याला वाटते ? रुपयाची किंमत कमी असणे म्हणजे आपण जे काम करतो त्याची गुणवता कितीही चांगली असली तरीही त्याची किंमत मात्र कमीच असेल हा एक प्रकारचा अन्याय आहे
या दोन्ही मधील तफावत कशी दूर करता येईल याचा अनेक थोर भारतीयांनी प्रयत्न केला आहे; महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला होता राजीव दीक्षितांनी स्वदेशी चळवळ सुरु केली होती.
स्वदेशी च्या नावाखाली देशवाशियांची लूट करणे म्हणजे स्वदेशी नव्हे. मला असे वाटते कि देशाबद्दल प्रेम, आभिमान हा प्रत्येक देशवाशीच्या मनात असायला हवा. आपल्याकडे आहे म्हणून पैश्यांची लूट करणे हे योग्य नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आहे. स्वदेशी चा स्वीकार हा प्रत्येकाने करावा स्वदेशीला प्राधान्य द्यावे ज्या गोष्टीला पर्याय नाही ती गोष्ट खूप गरजेची असेल तरच घ्यावी.
स्वदेशी म्हणजे बाहेरील वस्तूंचा बहिष्कार करा असे माझे म्हणणे नाही; परंतु जास्तीत जास्त देशी उत्पादने वापरण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयांनी करावा.
स्वदेशीचा जास्त वापर केल्यामुळे आपल्याकडे रोजगार निर्माण होतील आणि आपल्याच देशातील तरुण, शेतकरी, कामकरी, कामगार, व्यापारी सर्व वर्गातील लोकांना रोजगार मिळेल; हि कोणा एकाची किंवा सरकार ची जवाबदारी नाही तर प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.
आपल्या देशातील शेतकऱ्यांना जर आपण मदत केली तर आपण पूर्ण देशवासीयांना विषमुक्त अन्न खाऊ घालू शकतो आणि पूर्ण जगालाहि पुरवू शकतो आणि या मधून देश समृद्ध होण्यास नक्कीच मदत मिळेल. असे मला वाटते. भारत हा कृषिप्रधान देश आहे म्हणून शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे कृषी मंत्री हा शेतकरी असावा शेतीवर आधारित उद्योग धंद्यांना सरकार प्रोत्साहन द्यावे. भारतीय वस्तू एक ब्रँड म्हणून विकल्या जाव्यात त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्तेला नक्कीच मिळेल.
प्रत्येक भारतीयाने बचतीचे महत्व समजून घ्यावे व आपण किती कमावतो त्यापेक्षा आपण किती बचत करतो हे शिक्षण पुढील पिढीला देणे गरजेचे आहे. कोण किती खर्च करतो याची स्पर्धा नसावी तर कोण किती बचत करतो याची स्पर्धा असावी.
राजीव दीक्षितांनी सांगितल्या प्रमाणे टीव्ही पाहणे टाळावे कारण टीव्ही आपल्या डोक्यामध्ये नको त्या गोष्टीचा भडीमार करत असतो ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही त्या गोष्टी आपल्याला प्रतिष्ठेच्या वाटायला लागतात; जिवंत माणसांपेक्षा निर्जीव गोष्टीना आपण महत्व देतो.
सर्व देशवासीयांनी मी आगोदर भारतीय आहे हे प्रत्येक मान्य करावे आणि मग जात धर्म पंथ काय आहे याचा विचार नंतर करावा त्यामुळेच आपण अनेक जात धर्म पंथ वेगवेगळे असले तरी एका गोष्टीमुळे आपण एकत्र एक आहोत तो म्हणजे आपला देश आहे. "अनेकता मे एकता हिंद कि विशेषता, हम बुलबुले है इसकी यह गुलसिता हमारा।"
मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणाचाही तिरस्कार करायचा नाही तर आपल्याला आपल्या देशावर आपल्या देशबांधवांवर प्रेम करायचे आहे दुसऱ्याचा तिरस्कार करणे हि आपली संस्कृती नाही "अतिथी देवो भव" हि आपली संस्कृती आहे.
दुसऱ्या देशातील प्रॉडक्ट विकणे आणि ते विकणायचे शिक्षण देने हे आपल्याला घातक आहे हि शिक्षण पद्धती आपल्याला गुलाम बनवत आहे. आपल्या देशातील शेतकऱ्याच्या मुलांना शेतीचे शिक्षण दिले जात नाही हि खेदाची गोस्ट आहे.
भारत माझा देश आहे आणि प्रत्येक भारतीय माझा बांधव आहे हे वाक्य प्रत्येकाच्या मनावर कोरले गेले पाहिजे. जय हिंद
जोपर्यंत आपण देशाशी एकनिस्ट होत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या देशाचा विकास करू शकणार नाहीत त्यासाठी आपल्याला आपल्या राष्ट्रपुरुषांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांचा आदर्श जीवन पद्धतीचा स्वीकार करावा लागेल
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.
मित्रांनो आयष्यात भरपूर पैशे कमवा परंतु पैशे कमावण्यासाठी खोटे कधी बोलू नका. कारण एक खोटे बोलण्यासाठी हजार खोटे बोलावे लागणार आणि खोटे बोलणे आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे.
पूर्वीच्या काळी जसा भारत होता तसाच भारत आपल्याला पुन्हा निर्माण करावयाचा आहे, म्हणजे असे घर असेल कि जे आपल्या बहुतेक गरजा स्वतःच्या स्वतः पूर्ण करू शकेल असे गाव असेल जे स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करू शकेल आसा तालुका जिल्हा आणि राज्य असेल तर आपला देश आदर्श बनेल याचा विश्वास मला नक्की आहे प्रत्येकाने आपले घर आगोदर आदर्श बनवावे त्यामळे हे राष्ट्र आदर्श बनवणे हि एक कल्पना नाही तर ते एक सत्य असेल आणि सत्याचा विजय होईल सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य सत्यात उतरेल
माझे विचार आपल्याला सुबुद्धी देवो आदर्श भारताच्या सर्वाना शुभेच्छा

No comments:
Post a Comment